शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

ठाणे ‘गुणीजन’ पुरस्कार वादात, नगरसेवकांनी रेटल्या नको त्यांच्या शिफारशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:46 IST

मागील वर्षी वादादीत ठरलेल्या ठाणे महापालिकेचा वर्धापन यंदाही वादग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती...

ठाणे : मागील वर्षी वादादीत ठरलेल्या ठाणे महापालिकेचा वर्धापन यंदाही वादग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती. यामध्ये अनेक नगररेसवकांनी आपल्या कार्यकर्त्यांची शिफारस केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यामुळे यंदा अशा पुरस्कारांची खिरापत कमी करण्याचा निर्णय महापौर मीनाक्षी शिंदे यांनी घेतला आहे. परंतु,असे असतांनादेखील अनेक नगरसेवकांनी जे लायक नाहीत, अशांना पुरस्कार मिळावेत म्हणून शिफारसी केल्या आहेत. त्यामुळे यंदाही पालिकेचा वर्धापन दिन या पुरस्कारांच्या निमित्ताने वादात सापडला आहे.महापालिकेचा ३५ वा वर्धापन दिन सोहळा बुधवारी गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे. परंतु, यंदा पुन्हा पालिकेकडून दिल्या पुरस्काराच्या मुद्यावरून हा वर्धापन दिनात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. महापौर कार्यालयाकडे पुरस्कारासाठी लेखी शिफारशींचा खच पडू लागला आहे. यामध्ये नगरसेवकांनी शिफारस केलेल्या इच्छुकांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या एका नव्या दमाच्या नगरसेवकाने आपल्या पित्याला ठाणे भूषण पुरस्कार मिळावा म्हणून स्वत:च शिफारस केल्याचे पत्र महापौरांना दिले आहे.याशिवाय इतर गोंधळ आहे तो आहेच. मागील तीन दिवसांपासून अशा प्रकारे महापौर कार्यालयात शिफारशींचा पाऊस पडत आहे. परंतु, त्यांना नियमावली मात्र काहीच नाही. ज्या व्यक्तींची शिफारस केली जात आहे. त्या व्यक्तीची कोणतीही परिपूर्ण माहिती अथवा बायोडाटा मात्र जमा केला जात नाही. त्यामुळे एकूणच ठाणे गुणीजन पुरस्कार हे वादात सापडले आहेत. आपल्या कार्यकर्त्याचे समाधान व्हावे म्हणूनही काही नगरसेवकांनी या शिफारशी केल्याचे दिसत आहे.मागील वर्षी तर सुमारे ३०० हून अधिक जणांना अशा प्रकारे ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. शिफारस देण्याची शेवटची तारीख उलटून गेली असतांनाही अगदी कार्यक्रम सुरू होण्याच्या वेळेआधीदेखील शिफारसी दिल्या जात असल्याचा मुद्दा मागील वर्षी चांगलाच गाजला होता. प्रत्यक्षात ठाणे भूषण, गौरव, विशेष आणि गुणीजन हे मानाचे पुरस्कार समजले जात आहेत. त्यामुळे ते देतांना त्यांची संख्या किती असावी, याची मर्यादा असणे गरजेचे आहे.पुरस्कार देतांना त्या व्यक्तीचे कार्य पाहणे आणि यासाठी एका ज्युरी टीमची नेमणूक होणे महत्त्वाचे आहे. परंतु,असे काहीही घडत नसून या पुरस्कारांचा अवमान करण्याचे काम राजकीय मंडळींकडून केले जात आहे. त्यामुळे याला पायबंद घालण्याची गरज आता निर्माण झाली असून तशी मागणी आता जोर धरू लागली आहे.एकीकडे नको त्या मंडळींची शिफारस केली जात असतांना आणि जे या पुरस्कारांसाठी पात्र नसतांना अशांना हे पुरस्कार दिले जात आहेत. तर दुसरीकडे जे खरोखर या पुरस्कारासाठी पात्र अशांना मात्र डावलले जात असल्याची खंत व्यक्त होत आहे. ठाण्यातील लीला श्रोती यांना ठाणे भूषण अथवा गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकाने शिफारस पत्र दिले आहे. विशेष म्हणजे यामध्ये श्रोती यांनी केलेले संपूर्ण कार्यदेखील त्यांनी विषद केले आहे. श्रोती या शिक्षिका असून वयाच्या ९० व्या वर्षीदेखील बाह्यपरिक्षांची भुमिका बजावत असून त्यांच्या तालमीत संस्कृतमध्ये अनेकांनी प्रतितयश संपादन केले आहे. काही संस्थांनीदेखील त्यांचा नुकताच गौरव केला आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षिकेला मात्र वादादीत ठरत असलेला आणि खिरापत म्हणून वाटप केला जात असलेला ठाणे गुणीजन पुरस्कार देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे