शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

Thane Guidelines: ठाण्यात लॉकडाऊनचे निर्बंध झाले शिथील; रात्री १० वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 20:11 IST

राज्य शासनाने ११ जिल्हे वगळता इतर ठिकाणी ब्रेक द चेनचे नियम लागू केल्यानंतर मंगळवारी ठाणे महापालिकेने देखील ब्रेक द चेनची नियमावली जाहीर केली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाने ११ जिल्हे वगळता इतर ठिकाणी ब्रेक द चेनचे नियम लागू केल्यानंतर मंगळवारी ठाणे महापालिकेने देखील ब्रेक द चेनची नियमावली जाहीर केली. त्यानुसार ठाण्यात ३ ऑगस्ट र्निबध शिथील करण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. त्यानुसार आता ठाणे महापालिका हद्दीत अत्यावश्यक सेवेसह इतर दुकाने देखील आता रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. परंतु रविवारी मात्र अत्यावश्यक वगळता इतर दुकाने बंद असणार आहेत. तसेच मॉल्स सुरु करण्याला परवानगी देण्यात आलेली नाही. काय सुरु राहीलअत्यावश्यक सह इतर दुकाने सोमवार ते शनिवार रात्री १० वाजेर्पयत सुरु राहणार, मेडीकल, केमीस्ट शॉप सुरु राहणार, ५० टक्के  क्षमतेने हॉटेल दुपारी ४ वाजेर्पयत सुरु राहणार, हॉटेलमधील पार्सल सेवा सुरु राहणार, व्यायमशाळा, केश कर्तनालये, योग वर्ग, स्पॉ, ब्युटी पार्लर ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शनिवार, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ अशा वेळेत सुरु राहतील, शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरु, चित्रिकरण नियमित वेळेनुसार सुरु राहणार, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थिती मर्यादा, अंत्यविधीसाठी २० नागरीक, लग्न सोहळे ५० नागरीकांच्या उपस्थितीत, सार्वजनिक वाहतुक १०० टक्के क्षमतेने सुरु मात्र उभे राहून प्रवास करण्यास बंदी. जलतरण तलाव आणि निकट संपर्क येईल असे क्रिडा प्रकार वगळून अन्य इनडोअर व आऊटडोअर खेळांस यापूर्वी नियमित केलेल्या वेळेनुसार परवानगी असेल.  काय बंद राहीलअत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने ही रविवारी पूर्ण वेळ बंद राहणार, रविवारी हॉटेल बंद राहणार, व्यायमशाळा, केश कर्तनालये, योग वर्ग, स्पॉ, ब्युटी पार्लर रविवारी बंद राहणार, धार्मिक स्थळे, लोकल प्रवास बंद राहणार आहे. सिनेमागृहे, नाटय़गृहे, व मल्टीप्लेक्स बंद राहणार.

ऑर्डर येताच पुन्हा शटर झाले ओपनराज्य शासनाकडून जरी ठाण्यासह जिल्ह्याचे चित्र स्पष्ट करण्यात आले होते. तरी देखील त्याची अंमलबजावणी कशी करावी याचे अधिकारी स्थानिक संस्थांना देण्यात आले होते. त्यानुसार, मंगळवारी होणाऱ्या  बैठकीनंतरच ठाण्यासह इतर भागांचे चित्र स्पष्ट होणार होते. त्यामुळे मंगळवारी दुपारी ४ नंतर ठाण्यातील अत्यावश्यक सेवेतील वगळून इतर दुकाने बंद करण्यात आली होती. परंतु जशी ऑर्डर आली तशी ठाण्यातील सर्वच दुकाने पुन्हा सुरु करण्यात आल्याचे चित्र दिसून आले. ठाण्याचे एकूण चित्रकोरोनाचे एकूण रूग्ण - १३५८४६बरे झालेले रूग्ण - १३३२०४एकूण मृत्यू -२०६६सध्या उपचार घेत असलेले रूग्ण - ५७६सध्याचा पॉझटिव्हिटी रेट - ७.४०

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकthaneठाणे