शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

ठाणे : ओळख असल्याचे भासवून वयोवृद्धांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 15:55 IST

ठाण्यातील वयोवृद्ध नागरिकांना जुनी ओळख असल्याचे भासवून फसवणूक करुन त्यांना लुटणाऱ्या 13 जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.

ठाणे - ठाण्यातील वयोवृद्ध नागरिकांना जुनी ओळख असल्याचे भासवून फसवणूक करुन त्यांना लुटणाऱ्या 13 जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. बँकेत येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना बोलण्यात गुंतवून, नोटांसारख्या दिसणाऱ्या कागदाचे बंडल देऊन, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम काढुन घेऊन पसार होणे, तसेच काहींना धार्मिक बोलण्यात गुंतवून त्यांचे दागिने काढण्यास सांगून नंतर पन्नास पावल मागे न वळता पुढे चालत जाण्यास सांगून पळून जाणे, अशा प्रकारचे गुन्हे बऱ्याच प्रमाणे वाढल्याने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ .डी .एस .स्वामी यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस पथके स्थापन करण्यात आली होती. 

या चारी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे

1)राजू क्रुष्णा शेट्टी (अँटोप हिल मुंबई) 

2) रमेशकुमार विजयकुमार जैस्वाल (मुंबई) 

3) विलास रामू दळवी  (उल्हासनगर)

4) दिनेश भीमराव सुराडकर (उल्हासनगर)

5) संजय महांगडे (मुंबई) 

6) मोहम्मद आसीम मोहम्मद रफीक (आंबिवली) 

7) गणेश दत्तू ढोले (मुंबई)

8)शारबोन नवलु इस्लाम (मुंब्रा)

9) शंकर उर्फ मरीअप्पन मुरगेशन (डोंबिवली)

10) प्रदीप साहेबराव पाटील (म्हारळ कल्याण)

11) क्रुष्णकुमार श्यामराज सिंग (मुलुंड)

12) अर्जुन अमृतभाई सलाट (गुजरात)

13) अर्जुनभाई दनाभाई मारवाडी (गुजरात)

या 13 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून ठाणे नगर पोलीस स्टेशन येथील 12 गुन्हे, कळवा पोलीस ठाणे येथील 5 गुन्हे, नौपाडा पोलीस ठाणे येथील 14 गुन्हे, राबोडी पोलीस ठाणे येथील  एक गुन्हा असे एकूण 40 गुन्हे  उघडकीस आणले आहेत. शिवाय,  661 ग्रॅम सोन्याचे दागिने, 30 हजार रुपये रोख रक्कम आणि 20,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यातील सात आरोपी न्यायालयीन कोठडीत असून सहा आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :ThiefचोरthaneठाणेCrime Newsगुन्हेगारी