शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला

By जितेंद्र कालेकर | Updated: September 11, 2025 13:17 IST

Thane Cyber Crime Case: १५ दिवसांमध्ये ठाणे शहर परिसरात एक कोटींहून अधिक रकमेची सायबर गुन्हेगारांनी लुटल्याचे समोर आले आहे.

-जितेंद्र कालेकर, ठाणेThane Crime: सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या मार्गांनी सर्वसामान्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारला जात आहे. ठाण्यात एका पोलिस हवालदाराचीही अवघ्या तीन मिनिटांमध्ये आठ लाखांची फसवणूक झाली. गेल्या १५ दिवसांमध्ये ठाणे शहर परिसरात एक कोटींहून अधिक रकमेची सायबर गुन्हेगारांनी लुटल्याचे समोर आले आहे. या गुन्हेगारांचे आव्हान असले तरी अशी फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार करण्याचे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. 

मोबाइल हॅक करीत सायबर भामट्यांनी ठाणे वाहतूक शाखेच्या समाधान दळवी (नावात बदल) या पोलिस हवालदारालाच आठ लाखांचा गंडा घातला. त्यांचे एचडीएफसी बँकेत दोन लाख ११ हजार ३०० इतकी रक्कम शिल्लक होती. 

१ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांच्या सुमारास त्यांना एचडीएफसी बँकेचे पाच मेसेज आले. ऑनलाइन कर्ज प्रक्रियेसाठी हा मेसेज होता.  फंड ट्रान्सफर लिमिट वाढविण्यासाठी मेसेजद्वारे ओटीपी आला होता. त्यात फंडाची लिमिट १५ लाखांची होती. 

मेसेजमधील ओटीपी कोणालाही ट्रान्सफर न करताच अवघ्या तीनच मिनिटांत म्हणजे ९ वाजून १३ मिनिटांनी त्यांच्या बँक खात्यात सहा लाख ८१ हजार ३५० रुपये जमा झाल्याचाही त्यांना मेसेज आला. त्यानंतर पाच लाख आणि तीन लाख रुपये त्यांच्या बँक खात्यातून अवघ्या काही अंतराने सायबर भामट्याने अन्यत्र वळते केले. 

दळवी यांचा मोबाइल हॅक करून सायबर भामट्यांनी ऑनलाइन प्रोसिजर करीत बँकेतून त्यांच्या नावाने वैयक्तिक कर्ज काढले. बँक अधिकाऱ्यांनीही खातरजमा न करताच हे कर्ज मंजूरही केले. यातूनच आपली फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी  ५ सप्टेंबरला ठाणेनगर पोलिस ठाण्यात दाखल केली. 

तक्रारीनंतर बँक खाते गोठविले जाते

फसवणुकीमध्ये तक्रारीनंतर पोलिसांकडून संबंधित बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया केली जाते.  नागरिकांनी गोल्डन अवर्स म्हणजेच संबंधित बँक खात्यातून पैसे ठकसेनांकडून काढण्याच्या आधीच तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एका खासगी व्यावसायिकाला ३३ लाख ५८ हजारांचा गंडा घातल्याचा असाच आणखी एक  प्रकार समोर आला. या गेल्या पाच वर्षांपासून शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या या तक्रारदाराला २३ जुलै २०२५ रोजी अनन्या मेहता या महिलेचा फोन आला. 

मोतीलाल ओसवाल शेअर ट्रेडिंगमधून बोलत असल्याचे सांगत ब्लॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास  १० ते १५ टक्के नफा देण्याचे आमिष तिने दाखविले. त्यानंतर ॲप  डाऊनलोड करण्यास सांगून बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले.

२९ जुलै ते १८ ऑगस्ट दरम्यान  ट्रेडिंग कंपनीमध्ये ३३ लाख ५८ हजारांची रक्कम पाठविली. परंतु  त्यांना त्यांची मुद्दल किंवा नफ्याची कोणतीही रक्कम मिळाली नाही. या फसवणुकीची  व्यावसायिकाने ६ सप्टेंबरला चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमthaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस