शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

ठाणे फेस्टिव्हल : मंत्री जितेंद्र आव्हाडांवर पोलीस आयुक्तांची स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 00:58 IST

पूर्वी लोक कळवा बघून गाडी वळवा, असे म्हणायचे. आता लोक कळवा बघून गाडी पळवा, असे म्हणत आहेत. अत्यंत कमी काळात एवढा विकास झालेले हे एकमेव ठिकाण आहे.

ठाणे : पूर्वी लोक कळवा बघून गाडी वळवा, असे म्हणायचे. आता लोक कळवा बघून गाडी पळवा, असे म्हणत आहेत. अत्यंत कमी काळात एवढा विकास झालेले हे एकमेव ठिकाण आहे. कळवावासीयांनी नक्कीच चांगले प्रतिनिधी निवडून दिले आहेत, हे हा विकास आणि ठाणे फेस्टिव्हलकडे पाहून प्रतीत होत आहे, अशा स्तुतिसुमनांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे कौतुक केले.संघर्ष या सेवाभावी संस्थेच्या वतीने खारीगाव येथील ९० फूट रस्त्यावर आयोजित ठाणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनांनतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर बोलत होते. यावेळी या फेस्टिव्हलचे संयोजक गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, ऋता आव्हाड, संघर्षचे अध्यक्ष विनय परळीकर, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक मुकुंद केणी, प्रकाश बर्डे आदींसह इतर नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.फणसळकर पुढे म्हणाले की, हा फेस्टिव्हल म्हणजे कळव्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख झाली आहे. हायक्वॉलिटी आर्ट काय असते, हे येथे दिसून येत आहे. कळवा आणि ठाणेकरांनी आव्हाड यांचे आभारच मानायला हवेत की, त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे.कलासंस्कृतीचा मेळाचित्रकला, शिल्पकला, संस्कृती, संगीत आणि खाद्यपदार्थ यांचा सुरेख संगम साधणारा कलासंस्कृतीचा मेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवाला पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रसेनजित कोसंबी, प्रिया बर्वे, वैशाली माडे आणि अवधूत गुप्ते यांनी आपल्या सांगीतिक मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले, तर फेस्टिव्हलच्या दुसºया दिवशी सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत विक्रांत शितोळे या चित्रकाराने आपल्या हातातील ब्रशमधून वॉटर कलरवर आधारित लॅण्डस्केप पेंटिंगचा खास नमुना पेश केला. त्यानंतर, २४ रोजी मीत ब्रदर्स आणि खुशबू ग्रेवाल यांचा रॉकिंग परफॉर्मन्सही सादर झाला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे