ठाणे जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांची बुधवारी सामूहीक रजा; शनिवारी संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 08:36 PM2019-08-27T20:36:16+5:302019-08-27T20:45:42+5:30

 महाराष्ट्र  राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पाटील यांना निवेदन देऊन २८ ते ५ सप्टेंबर या कालावधीतील तीन दिवसांच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. उद्याच्या सामुदयीक रजेच्या धरणे आंदोलनात जिल्ह्यात शेकडो कर्मचारी सहभागी होणार आहेत.

Thane district's Revenue staff leave on Wednesday; Saturday is over | ठाणे जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांची बुधवारी सामूहीक रजा; शनिवारी संप

लाक्षणीक संपाचा इशाराही या महसूल कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना दिला

Next
ठळक मुद्देनायब तहसीलदारांना ग्रेड पे मात्र वर्ग तीनचालिपिकाचे नाव बदलून महसूल सहाय्यक असे नामकरणरक्तदान करून राज्य शासनाचा जाहीर निषेध करणार

ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार आॅफिस, तलाठी कार्यालये आदी ठिकाणी कार्यारत असलेले महसूल कर्मचारी २८ आॅगस्ट रोजी सामूहीक रजा घेऊन धरणे आंदोलन छेडणार आहे. यामुळे नागरिकांचे विविध कामे रखडणार आहे. तर ३१ आॅगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणीक संपाचा इशाराही या महसूल कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना आज निवेदनाव्दारे दिला आहे.
         महाराष्ट्र  राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पाटील यांना निवेदन देऊन २८ ते ५ सप्टेंबर या कालावधीतील तीन दिवसांच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. उद्याच्या सामुदयीक रजेच्या धरणे आंदोलनात जिल्ह्यात शेकडो कर्मचारी सहभागी होणार आहेत. यानंतर शनिवारच्या एक दिवशीय लाक्षणिक संपाच्या कालावधीत कर्मचारी रक्तदान करून राज्य शासनाचा जाहीर निषेध करणार आहे. यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास या कर्मचाऱ्यांनी ५ सप्टेंबरपासून बेमुदत संप सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वाघचौडेसह मुख्य सल्लागार भास्कर गव्हाळे यांनी लोकमतला सांगितले.
        राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा दिलेल्या नायब तहसीलदारांना ग्रेड पे मात्र वर्ग तीनचा दिला जात आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी ग्रेडपे चार हजार ६०० रूपये करण्यात यावे, लिपिकाचे नाव बदलून महसूल सहाय्यक असे नामकरण करावे, नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाणे ३३ टक्के ऐवजी २० टक्के करा, अव्वल कारकूनच्या वेतन श्रेणीमधील त्रृटी दूर करा,दांगट समितीनुसार पदे मंजूर करा, इतर विभागांच्या कामासाठी नव्याने आकृती बंध तयार करा आदी १८ प्रकारच्या प्रलंबित मागण्यांसाठी आता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उचलले आहे.

Web Title: Thane district's Revenue staff leave on Wednesday; Saturday is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.