शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

ठाणे जिल्ह्यातील धरणातील साठ्यात झपाट्याने घट; एमआयडीसीकडून पाण्याची चोरी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 19:18 IST

सध्या स्थितीला पाण्याची बचत करण्याचे धोरण स्विकारणे स्वागतार्थ मानले जात आहे. यामुळे शहरातील काही हॉटेल्समध्ये अर्धा ग्लास पाणी देण्यास सुरूवात झाली आहे. तर रस्त्याच्या कडेचा नळ बंद करण्याची जाणीव नागरिकांमध्ये दिसून येत आहे. यातून पाणी बचत होण्यास मदत होत आहे. मात्र एमआयडीसी त्यांच्या ५८३ दश लक्ष लिटर मंजूर पाणी को्यापेक्षा सुमारे ८०० ते ८५० दशलक्ष लिटर पाणी रोज उचलत आहे, असे संबंधीत विभागाच्या निदर्शनात आले. सक्तीने पाणी चोरी सक्तीने बंद केलेली असतानाही एमआयडीसीकडून त्यास प्रतिसाद दिला जात नाही.

ठळक मुद्देभातसा धरणात १७ दश लक्ष घनमीटर तर बारवीत दहा दशलक्ष घनमीटर पाणी साठा कमी मात्र एमआयडीसीकडून अद्यापही पूर्वीप्रमाणेचे पाण्याची चोरी सुरू पाणी समस्या गंभीर असूनही या धरणातून एमआयडीसी २०० ते २६५ एमएलडी पाणी जास्त उचलत असल्याची गंभीरबाब

सुरेश लोखंडेठाणे : पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठा मागील वर्षाच्या तुलनेत झपाट्याने कमी झाला आहे. भातसा धरणात १७ दश लक्ष घनमीटर तर बारवीत दहा दशलक्ष घनमीटर पाणी साठा कमी झाला आहे. तरी देखील सध्याच्या कपातीमधील वाढ टाळण्यासाठी जादा म्हणजे चोरून पाणी उचलण्यास सक्तीने बंदी घातली आहे. मात्र एमआयडीसीकडून अद्यापही पूर्वीप्रमाणेचे पाण्याची चोरी सुरू असल्याचे निदर्शनात आल्याचे संबंधीतांकडून नमुद करण्यात आले आहे. या पाणी चोरीला वेळीच थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.सध्या स्थितीला पाण्याची बचत करण्याचे धोरण स्विकारणे स्वागतार्थ मानले जात आहे. यामुळे शहरातील काही हॉटेल्समध्ये अर्धा ग्लास पाणी देण्यास सुरूवात झाली आहे. तर रस्त्याच्या कडेचा नळ बंद करण्याची जाणीव नागरिकांमध्ये दिसून येत आहे. यातून पाणी बचत होण्यास मदत होत आहे. मात्र एमआयडीसी त्यांच्या ५८३ दश लक्ष लिटर मंजूर पाणी को्यापेक्षा सुमारे ८०० ते ८५० दशलक्ष लिटर पाणी रोज उचलत आहे, असे संबंधीत विभागाच्या निदर्शनात आले. सक्तीने पाणी चोरी सक्तीने बंद केलेली असतानाही एमआयडीसीकडून त्यास प्रतिसाद दिला जात नाही. याकडे संबंधीत प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन एमआयडीसीवर कारवाई करीत जादा पाणी उचलण्यास बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची खंत आहे.बारवी धरणात मागच्या वर्षी आजच्या दिवशी २१०.२७ दश लक्ष घनमीटर म्हणजे ९०.२२ टक्के पाणी साइा होता. आता तो दहा दश लक्ष घनमीटने कमी होऊन केवळ ८१.१३ टक्के साठा शिल्लक आहे. मागील आठव्याच्या तुलनेत दोन टक्के पाणी साठा कमी झाल्याची धक्कादायक माहिती आहे. पाणी समस्या गंभीर असूनही या धरणातून एमआयडीसी २०० ते २६५ एमएलडी पाणी जास्त उचलत असल्याची गंभीरबाब संबंधीत विभागाकडून सांगितली जात आहे. भातसाधरणात मागील वर्षाच्या तुलने १७ दश लक्ष घनमीटर पाणी साठा कमी झाला आहे. आंध्रा धरणात सहा दश लक्ष घनमीटर पाण्याची तूट आहे. यातूनही सुरळीत पाणी पुरवठा कमी होण्यासाठी २२ टक्के पाणी कपात लागू आहे. त्यापोटी आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केले. या कपातीत वाढ होऊ नये, यासाठी मंजूर पाणी कोट्यापेक्षा चोरून जादा पाणी उचलणाºयावर कारवाईचे संकेत आहे. यास अनुसरून एमआयडीसीवर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.* मध्ये वैतरणाच्या पाण्यामुळे मोकड सागरचा साठा वाढला -अवकाळी पाऊस पडलेला नसतानाही मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या  मोडक सागर धरणात मागील आठव्याच्या तुलनेत सुमारे चार दश लक्ष घनमीटर पाणी साठा वाढल्याचे निदर्शनात आले. यास अनुसरून चौकशी केली असता अप्पर वैतरणाचे सुमारे ३०० ते ४०० क्युसेस पाणी मध्यवैतरणात सोडले जाते. त्यानंतर हे पाणी मोडक सागरमध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे या धरणातील पाणी साठा वाढलेला दिसूत असल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या संबंधीत विभागाकडून करण्यात आले आहे. यानुसार मोडक सागरमध्ये सध्या ४३ दश लक्ष घनमीटर पाणी साठा आहे. मागील आठवड्यात त्यात केवळ ३८.९१ दश लक्ष घनमीटर पाणी साठा होता.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईthaneठाणेWaterपाणी