शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

ठाणे जि. प.च्या ७३ कोटीं खर्चाच्या प्रशासकीय नवीन इमारत बांधकामाला शासनाची तांत्रिक मान्यता

By सुरेश लोखंडे | Updated: October 19, 2023 16:39 IST

जिल्हा परिषदेच्या जुन्या मुख्य इमारतीचे २०१९ मध्ये स्थापत्यविषयक लेखापरीक्षण करण्यात आले.

ठाणे : येथील जिल्हा परिषदेची १९६५- ६६ साली बांधण्यात आलेल  इमारत चार वर्षांपूर्वी पाडण्यात आली. याच ठिकाणी नवी प्रशासकीय इमारत उभी होणार आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यने आज राज्य शासनाची मंजुरी मिळाली. जि. प. तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्ययांनी देखील या इमारतीसाठी अथक प्रयत्न केलेल  आहे. आता या बातमी बांधकामाची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ७३ कोटी २५ लाख रुपये खर्चून ही इमारत बांधली जाणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या जुन्या मुख्य इमारतीचे २०१९ मध्ये स्थापत्यविषयक लेखापरीक्षण करण्यात आले. त्यात इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने नव्या इमारती संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला. या प्रस्तावाला शासकीय मान्यता मिळाली. ७३ कोटी २५ लाख ३७ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.  तर ६२ कोटी ६४ लक्ष ६६ हजार १६३ रुपयांची तांत्रिक मान्यता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.‌त्यामुळे आता या कामास गती मिळाली आहे. या नव्या इमारती मध्ये सर्व विभाग एकत्रित समन्वयाने काम करू शकणार आहेत. त्यामुळे कामकाज सुरळीत चालू राहण्यास मदत होईल.‌  

या नव्या इमारतीची वैशिष्ट्य म्हणजे तळमजला अधीक ३ मजली पार्किंग व ८ मजली इमारत ही तयार होणार आहे. तब्बल २० हजार १७३.२७ चौरस, मीटर क्षेत्रफळाची ही इमारत राहणार आहे. प्रवेशद्वार व स्वतंत्र कमान राहणार असून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र फर्निचरची व्यवस्था आहे. विद्युतिकरणाची कामे, अंतर्गत रस्ते , सुशोभीकरणाची कामे, इमारतीच्या सभोवताली संरक्षक भिंतीचे काम. इमारतीत ५६३ दुचाकी व ५७ चार चाकी वाहनासाठी स्वतंत्र पार्किंग. ठाणे महानगरपालिकेकडून पाण्याची स्वतंत्र व्यवस्था , अग्निशामक यंत्रणेसाठी दोन लाख  लिटरची पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. अस्तित्वातील ५४ गाळे धारकांसाठी इमारतीत विचार करण्यात आलेला आहे. सौर ऊर्जा नेट मीटर सिस्टिम, परिसर विकसित करणे. अग्निशमन यंत्रणा सुविधा रेन वाँटर हार्वेस्टिंग, स्ट्राँम वाँटर ड्रेन, भुमिगत पाण्याची टाकी, मलनिस्सारण प्रकल्प (एसटीपी). याशिवाय प्रक्रिया केलेल्या पाण्याचा फ्लशिंग व बागकामासाठी पुनर्वापर करण्याची सोय, या नवीन इमारतीत राहणार आहे.

टॅग्स :thaneठाणे