शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी ठरले "आयर्न मॅन" अर्थात 'लोहपुरुष'

By सुरेश लोखंडे | Updated: September 12, 2023 23:32 IST

ही स्पर्धा रविवारी कोल्हापूर येथे पार पडली होती.

ठाणे :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांना आधीपासून व्यायामाची आवड आहे. कोल्हापूर येथील डेक्कन स्पोर्टस् क्लब तर्फे आयोजित लोहपुरूष 'ट्रायथलॉन' या स्पर्धेत त्यांनी  इतर ९९ स्पर्धकांना पिछाडीवर टाकत विविध तीन टप्यातील ही स्पर्धा अलिकडेच जिंकली. त्यामुळे ते आता आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” म्हणून ओळखले जाणार असल्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी अधिकृतपणे जाहीर केले. ही स्पर्धा रविवारी कोल्हापूर येथे पार पडली होती.

मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गजरे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २००७ ची सरळसेवा परीक्षा दिल्यानंतर ते त्यात यशस्वी झाले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेले गजरे आता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. व्यायमाची आवड गजरे यांना स्वस्थ बसू देत नाही. दरम्यान कोल्हापूर येथील या तीन टप्यातील स्पर्धेत मोठ्या जिद्दीने उतरलेले गजरे यशस्वी 'आयर्न मँन' ठरले. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात स्पर्धकांना कोल्हापूरच्या प्रसिध्द राजाराम तलावात १.९ किलोमीटर पोहणे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लगेचच कोल्हापूर-बॅंगलोर महामार्गावर ९० किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ३.२१ किलोमीटर (अर्ध मॅरेथॉन) पूर्ण करणे आवश्यक होते.        स्पर्धा पूर्ण करण्यासाठी निर्धारीत वेळ १० तास इतकी होती. स्पर्धा सकाळी ६.३० वाजता सुरू झाली आणि . गजरे यांनी दुपारी २.५५ वाजता ही स्पर्धा पूर्ण केली. अवघ्या ८ तास २५ मिनिटात गजरे यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या जिंकली. अन् त्यांनी पटकाविला “आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” किताब..! यापूर्वी ही ९० किलोमीटर अंतर १२ तासात पूर्ण करणे, ही अट असलेली जगातील सर्वात कठीण व जुनी मॅरेथॉन ऑगस्ट २०२२ मध्ये गजरे यांनी पू्र्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील स्पर्धा पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि त्यात ते यशस्वी ही झाले. या स्पर्धेला जिंकण्यासाठी त्यांनी रोज सकाळी ५ ते ७ वाजे दरम्यानचा किमान २ तासाचा वेळ दिला. यामध्ये त्यांनी सायकल चालविणे, पोहणे व धावणे या तिन्ही खेळांचा सातत्याने सराव केला. यासोबतच खाण्यापिणाच्या सवयींवर बारकाईने लक्ष दिले. लवकर झोपणे लवकर उठणे, हा मंत्र त्यांनी कटाक्षाने प्रत्यक्ष कृतीत आणला. या यशाबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी गजरे यांनी इतरांबरोबरच विशेष करुन शासकीय अधिकाऱ्यांसाठी “आरोग्य हीच खरी संपत्ती” असल्याचा संदेश दिला आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी व्यायामासाठी वेळ जरुर काढावा, असे आवाहन त्यांनी अधिकारी वर्गाला केले आहे.ते ठाणे येथे गेल्या १ जूनपासून जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून आज रोजी सक्रीय आहे. 

टॅग्स :thaneठाणे