ठाणे जिल्हा पुरवठा विभागाचा छापा

By Admin | Updated: August 3, 2015 01:11 IST2015-08-03T01:11:28+5:302015-08-03T01:11:28+5:30

भिवंडी, दिवा-अंजूरगावातील गोदामावर राज्य दक्षता पथकासह ठाणे जिल्हा पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यात शिक्षण विभागाच्या माध्यान्ह भोजन योजनेतील

Thane District Supply Department's Print | ठाणे जिल्हा पुरवठा विभागाचा छापा

ठाणे जिल्हा पुरवठा विभागाचा छापा

ठाणे : भिवंडी, दिवा-अंजूरगावातील गोदामावर राज्य दक्षता पथकासह ठाणे जिल्हा पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यात शिक्षण विभागाच्या माध्यान्ह भोजन योजनेतील ४० ते ५० किलो तांदळाच्या २१० गोण्या तांदूळ ताब्यात घेण्यात आला आहे. याबाबत, शहरी आणि ग्रामीण शिक्षण विभागांकडून माहिती मागविल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने सांगितले. बोरीवलीवरून निघालेला हा तांदूळ दिवा-अंजूरगावातील भिवंडी इंडियन लॉजिस्टिक गोदामात खाली केल्याची माहिती राज्य दक्षता पथकाला मिळाली. त्यानुसार, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथक आणि ठाणे जिल्हा पुरवठा विभाग यांनी छापा टाकला.

Web Title: Thane District Supply Department's Print