ठाणे जिल्ह्याला मिळाला आणखी ८० हजार ५०० लसींचा साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 06:16 PM2021-04-19T18:16:50+5:302021-04-19T18:20:20+5:30

ठाणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मागील काही दिवसापासून लसीकरण मोहीमेचा फज्ज़ा उडाल्याचे चित्र दिसत होते. तर लसींचा साठा अपुरा असल्याने विकेन्ड लॉकडाऊनचे कारण देत ठाण्यासह अनेक ठिकाणी लसीकरण दोन दिवस बंद ठेवले होते.

Thane district received another stock of 80,500 vaccines | ठाणे जिल्ह्याला मिळाला आणखी ८० हजार ५०० लसींचा साठा

ठाणे जिल्ह्याला मिळाला आणखी ८० हजार ५०० लसींचा साठा

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे  शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मागील काही दिवसापासून लसीकरण मोहीमेचा फज्ज़ा उडाल्याचे चित्र दिसत होते. तर लसींचा साठा अपुरा असल्याने विकेन्ड लॉकडाऊनचे कारण देत ठाण्यासह अनेक ठिकाणी लसीकरण दोन दिवस बंद ठेवले होते

ठाणे  : मागील काही दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्यात लसीकरणाचा साठा अपुरा पडू लागला होता. त्यानंतर जिल्ह्याला ८५ हजार लसींचा साठा उपलब्ध् झाला होता. त्यानंतर ८१ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला होता. आता रविवारी आणखी ८० हजार ५०० लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे लसीकरण मोहीमेला वेग आल्याचे चित्र दिसत होते. आधी देखील ठाणे, नवी मुंबईला लसींचा जास्तीचा साठा मिळाला होता. आता आलेल्या ८१ हजार लसींमध्ये देखील ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीणला लसीचा जास्तीचा साठा मिळाला आहे. आता कोविशिल्ड बरोबर कोव्हॅक्सीनचा देखील साठा मिळाला आहे.

ठाणे  शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मागील काही दिवसापासून लसीकरण मोहीमेचा फज्ज़ा उडाल्याचे चित्र दिसत होते. तर लसींचा साठा अपुरा असल्याने विकेन्ड लॉकडाऊनचे कारण देत ठाण्यासह अनेक ठिकाणी लसीकरण दोन दिवस बंद ठेवले होते. परंतु जिल्ह्यासाठी मागील सोमवारी  ८५ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला. तर मंगळवारी दुपार नंतर आणखी ८१ हजार लसींचा साठा उपलब्ध जाला आहे. त्यात आता पुन्हा ८० हजात ५०० लसीचा साठा मिळाला आहे, त्यामुळे आता ठाण्यासह जिल्ह्यच्या विविध भागात लसीकरणाला वेग आला आहे.  या लसीमधे कॉवेक्सिन चा ७ हजार ३०० तर  कोव्हीशिल्डच्या ७३ हजार २०० लस मिळाल्या आहेत. उपलब्ध झालेला साठा वितरीत केल्यानंतर प्रत्येक महापालिकेच्या वाटेला ४ ते १८ हजार र्पयत साठा मिळाला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस पुरेल एवढा हा साठा असल्याची माहिती सुत्रंनी दिली आहे. त्यानुसार सोमवारी लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर ठाण्यात सर्व ५६ केंद्र सुरु होती. 

महापालिका मिळालेला लसींचा साठा
कोव्हीशिल्ड  - किवेक्सिन                             
ठाणे  - १५००० - १५००
नवीमुंबई - २०००० -२०००
कल्याण डोंबिवली - १०००० -१५००
उल्हासनगर - ७००० - ५००
भिवंडी - २००० - --
मिराभाईंदर - १०००० - १०००
ठाणो ग्रामीण - २००० -८००
--------------
एकूण  - ७२,3००

Web Title: Thane district received another stock of 80,500 vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.