ठाण्यात तरुणाईला ‘एमडी’चा विळखा

By Admin | Updated: September 30, 2015 00:08 IST2015-09-30T00:08:27+5:302015-09-30T00:08:27+5:30

एमडी अर्थात मेफे ड्रॉन या विषारी पावडरची नशा करणाऱ्यांच्या संख्येत ठाण्यातील महाविद्यालयीन युवकयुवतींमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.

In the Thane district, the 'MD' is set up | ठाण्यात तरुणाईला ‘एमडी’चा विळखा

ठाण्यात तरुणाईला ‘एमडी’चा विळखा

जितेंद्र कालेकर, ठाणे
एमडी अर्थात मेफे ड्रॉन या विषारी पावडरची नशा करणाऱ्यांच्या संख्येत ठाण्यातील महाविद्यालयीन युवकयुवतींमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये केंद्र शासनाने एमडीचा अंमली पदार्थांमध्ये समावेश केल्यानंतर यातील आरोपींवर कडक कारवाई होऊ लागल्याने आता हे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झाले तरीही ठाण्यातील तरुणांना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मोठी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. यासाठी पालकांनीही जागृकता दाखवून ‘काहीतरी कर’णे अपेक्षित आहे. म्हणूनच लोकमतने ‘काहीतरी कर ठाणेकर’ या आपल्या मोहिमेत आता एमडीबाबत जनजागरण चळवळ हाती घेतली आहे. या विषयी आपल्या प्रतिक्रीया लोकमत कार्यालयसह काहीतर कर ठाणेकरच्या फेसबुक पेजवर नोंदविण्याचे आवाहन या निमित्ताने लोकमतने केले आहे.
एमडीसह चरस, गांजा, हेरॉईन, क ोकेन, एलएसडी आदींचा अंमली पदार्थांमध्ये समावेश होतो. याशिवाय, खोकल्यावरील औषधे रेक्सबुल, रेक्सकॉप, आरकॉप यामध्ये कोडीन फॉस्फेट असल्याने त्याचीही नशेसाठी विक्री होते. तर ट्रॅनॅक्स या गोळीला ‘बटन’ असे संबोधून तिचेही सेवन केले जाते. सध्या, मुंब्रा, ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या परिसरातील शाळकरी मुले हे गांजा, चरस, ब्राऊन शुगर तसेच कोकेन या सर्वांपेक्षाही घातक एमडी च्या आहारी जात आहेत. त्याची एका प्लॉस्टीकच्या पिशवीतून विक्री होणारी ही पावडर ८०० रूपयांमध्ये १०० ग्रॅम अशी विकली जाते. तिच्या सेवनाने झोप आणि भूक लागत नाही. तात्पुरता उत्साह जाणवतो. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तिच्या सेवनाचे प्रमाण अधिक आहे. तसेच लैंगिक क्षमताही वाढते, असा समज आहे. पान मसाला, गुटख्यात किंवा नाकाने ही पावडर ओढली जाते. सुरुवातीला एक दोन वेळा मोफत देऊन एमडीची सवय लावली जाते. नंतर दोन ग्रॅमची विक्री करुन एक ग्रॅम मोफत देण्याचे प्रलोभन दिले जाते. त्यानंतर मात्र संबंधित तरुण किंवा तरुणी या एमडीच्या आहारी गेलेली असते.

Web Title: In the Thane district, the 'MD' is set up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.