शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५० कोटींचा ढोबळ नफा; ८४९ कोटींच्या खेळत्या भांडवलात वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 6:57 PM

बँकेने मागील वर्षी १०९ कोटी ९० लाख रूपये ढोबळ नफा मिळवला होता. यंदा हा नफा १५९कोटी ८५ लाख रूपये झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात ४९ कोटी ९४ लाख ७७ हजार रूपयांची भरघोस वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर आठ हजार ३१५ कोटी १३ लाख रूपयांचे खेळते भांडवल मिळवत त्यात मागील वर्षांपेक्षा ८४८ कोटी ९५ लाख ३२ हजार रूपयांच्या भांडवलात वाढ केली आहे. बँकेने यंदा ठेविंमध्ये ७१६ कोटी तीन लाख रूपयांची वाढ केली

ठळक मुद्देबँकेने तीन हजार १३ कोटी २८ लाख रूपयांचे कर्ज वाटप केलेमागील वर्षापेक्षा ४२ कोटी ७२ लाख ४७ हजार रूपयांची जास्त थकबाकी वसूल बँकेचा सीडीरेशो देखील १०.८३ टक्केने वाढला

ठाणे : यंदाही नाबार्डकडून ‘अ’ वर्ग प्राप्तीचा दर्जा मिळवणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने ही २४ वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. या बँकेने मार्च अखेर ४९ कोटी ९५ लाख रूपयांचा ढोबळ नफा मिळवत खेळत्या भांडवलामध्ये वर्षभरात ८४८ कोटी ९५ लाख रूपयांची भरघोस वाढ केली, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील,उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे आणि सीईओ भगीरथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.बँकेने मागील वर्षी १०९ कोटी ९० लाख रूपये ढोबळ नफा मिळवला होता. यंदा हा नफा १५९ कोटी ८५ लाख रूपये झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात ४९ कोटी ९४ लाख ७७ हजार रूपयांची भरघोस वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर आठ हजार ३१५ कोटी १३ लाख रूपयांचे खेळते भांडवल मिळवत त्यात मागील वर्षांपेक्षा ८४८ कोटी ९५ लाख ३२ हजार रूपयांच्या भांडवलात वाढ केली आहे. बँकेने यंदा ठेविंमध्ये ७१६ कोटी तीन लाख रूपयांची वाढ केली आहे. सहा हजार ९७८ कोटी १६ लाख रूपये ठेवी मार्च अखेर निश्चित झाल्या आहेत. मागील वर्षी सुमारे सहा हजार २६२ कोटी १३ लाखांच्या ठेवी होत्या. याशिवाय स्वनिधीमध्ये देखील ४१ कोटी १८ लाखांची वाढ केली आहे. मागील वर्षी ९१२ कोटी ९३ लाखांचा स्वनिधी होता. तो आता ९५४ कोटी ११ लाख रूपये झाला आहे. यामुळे बँकेचा एकूण निधी एक हजार ३७ कोटी ३५ लाख ७३ हजार रूपये झाला आहे. या निधीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ८९ कोटी पाच लाखांची वाढ झाली आहे.बँकेचे शेअर एक कोटी ९८ लाखांनी वाढले आहेत. ते ४१ कोटी पाच लाख होते. बँकेने तीन हजार १३ कोटी २८ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्ज वाटपात मागील वर्षापेक्षा ९८७ कोटी ४६ लाखांची वाढ केली आहे. थकबाकीमध्ये देखील बँकेने ३.३० टक्के घट केली आहे. गेल्यावर्षी २९२ कोटी एक लाखांची थकबाकी वसूली केली होती. ती यंदा ३३४ कोटी ७३ लाख ८७ हजार वसूल झाले आहेत. म्हणजे मागील वर्षापेक्षा ४२ कोटी ७२ लाख ४७ हजार रूपयांची जास्त थकबाकी वसूल करण्यात आली आहे. याशिवाय बँकेचा सीडीरेशो देखील १०.८३ टक्केने वाढला आहे. वर्षभरात बँकेच्या ठिकठिकाणी दोन शाखा नव्याने सुरू केल्या आहे. यामुळे टीडीसीसीच्या आता ११३ शाखा सुरू आहेत. या बँक शाळांमध्ये २९ हजार ४३५ कर्जदारांची वाढ झाली आहे. तर ८८ हजार ४६० ठेविदारांच्या संख्येतही भरीव वाढ केल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला. सामाजिक बांधिलकीचे भान राखून विविध समाजिक विकासाच्या योजना बँकेने हाती घेतल्या आहेत. मात्र आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून योजना उघड करण्यात बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाने नकार दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेbankबँक