शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील सराफाच्या दुकानातून साडे पाच कोटींच्या दागिन्यांची चोरी, मंगळवारी पहाटेची घटना

By जितेंद्र कालेकर | Updated: December 17, 2024 19:52 IST

Thane Crime News: ठाण्यातील वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रा. लि. या सोने चांदीचे दागिने असलेल्या दुकानामध्ये चोरटयांनी शटर उचकटून तब्बल साडे सहा किलोचे पाच कोटी ५० लाखांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना मंगळवारी पहाटे १.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली.

- जितेंद्र कालेकर ठाणे - ठाण्यातील वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रा. लि. या सोने चांदीचे दागिने असलेल्या दुकानामध्ये चोरटयांनी शटर उचकटून तब्बल साडे सहा किलोचे पाच कोटी ५० लाखांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना मंगळवारी पहाटे १.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

नेहमीप्रमाणे या दुकानाचे मालक वामन मराठे हे १७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास नौपाडयातील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील हे दुकान उघडण्यासाठी गेले. त्यावेळी आपल्या दुकानात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. चोरटयांनी ‘अभिवादन’ बिल्डींगमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या या दुकानाचे तळमजल्यावरील आणि पहिल्या मजल्यावरील अशी दोन शटर तोडून आत शिरकाव केला. चोरीचा प्रकार पहाटे १.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास घडला. दोन अज्ञात चोरटयांनी दुकानात शिरुन ही धाडसी चोरी केल्याचे सीसीटीव्हीतील चित्रणावरुन स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. नेमकी किती आणि कोणत्या दागिन्यांची चोरी झाली याचा तपशील आणि हिशेब सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात येत होता. त्यामुळेच चोरी झाल्यानंतर उशिरापर्यंत याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

घटनास्थस्ळी ठाणे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विनायक देशमुख, ठाण्याचे प्रभारी पोलिस उपायुक्त शशीकांत बोराटे, नाैपाडा विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त प्रियंका ढाकणे आणि नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन आदींनी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील चाेरटयांचा माग काढण्यात येत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीGoldसोनं