शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे गुन्हे शाखेने डायघर येथून केली गांजाच्या तस्कराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 20:52 IST

मुंब्रा कौसा पासून जवळच असलेल्या डायघर परिसरातील एका हॉटेलसमोर गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या अभिषेक भोसले याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून सहा किलो गांजाही जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसहा किलोचा गांजा हस्तगतडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: डायघर येथील कल्याण चौक भागात गांजाची तस्करीसाठी आलेल्या अभिषेक भोसले (२०, रा. मानपाडा, कल्याण) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने रविवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून ७२ हजारांचा सहा किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.मुंब्रा पनवेल रोडवरील कल्याण चौक येथील सुनिल बार अ‍ॅन्ड रेस्टॉरन्टच्या समोर २० ते ३० वयोगटातील दोघेजण गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे यांच्यासह पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे, समीर अहिरराव, उपनिरीक्षक अशोक माने, कैलास सोनवणे आणि दत्तात्रय सरक आदींच्या पथकाने डायघर भागात सापळा रचून अभिषेक भोसले (रा. भोसलेवाडी,अभिषेक भोसले (२०, रा. मानपाडा, कल्याण) याला गांजा विक्री प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाने ५ आॅक्टोंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शीळ डायघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सखोल चौकशीअंती ६ आॅक्टोंबर रोजी अटक करण्यात आली असून ठाणे न्यायालयाने त्याला ९ आॅक्टोंबरपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक अशोक माने याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीmumbraमुंब्रा