शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये गांजाची तस्करी करणा-या आरोपीच्या कोठडीत वाढ : ठाणे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 18:45 IST

कल्याणमधून गांजाची तस्करी करणा-या रिक्षा चालक अच्चूला अटक केल्यानंतर चौकशीत त्याने विशेष काहीच माहिती दिली नाही. पोलिसांच्या मागणीनंतर ठाणे न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.

ठळक मुद्दे कल्याणच्या बैलबाजार परिसरात गांजाची विक्रीगांजा तस्करीत टोळीची शक्यताएनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा

ठाणे : कल्याण परिसरातून गांजाची तस्करी केल्याप्रकरणी अटक केलेल्या अच्चू ऊर्फ अब्दुल रशीद शेख (४५, रा. बैलबाजार, कल्याण) या रिक्षाचालकाला २० फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाण्याचे विशेष न्या. व्ही.व्ही. बंबार्डे यांनी दिले आहेत. त्याच्याकडून ६० हजारांचा चार किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.कल्याणच्या बैलबाजार जेठा कम्पाउंड परिसरातून गांजाची तस्करी केल्याप्रकरणी अच्चूला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे आणि उपनिरीक्षक अमृता चवरे यांच्या पथकाने १३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्याच्याकडे मिळालेल्या चार किलोच्या गांजाच्या चौकशीसाठी न्यायालयाने सुरुवातीला त्याला १७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली. दरम्यान, त्याने हा गांजा कोणाकडून आणला? कोणाला विक्री करणार होता? त्याचे आणखी कोण कोण साथीदार आहेत? तो कधीपासून हे काम करतो? अशा कोणत्याच प्रश्नांची त्याने चौकशीत उत्तरे दिली नाही. तपासात तो कोणत्याही प्रकारे तो सहकार्य करीत नसल्यामुळे त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. त्याच्या कोठडीची मुदत शनिवारी संपताच त्याला आणखी तीन दिवस म्हणजे २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून याप्रकरणी सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा