गांजाची तस्करी करणा-यास कल्याणमधून अटक: चार किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 07:09 PM2018-02-15T19:09:10+5:302018-02-15T19:28:38+5:30

गांजाची तस्करी करणा-या एका रिक्षा चालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभगाने कल्याणमधून अटक केली आहे. त्याने हा गांजा कोणाकडून आणला? तो कोणाला विक्री करणार होता? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Ganges traffickers arrested from welfare: Four kg of ganja seized | गांजाची तस्करी करणा-यास कल्याणमधून अटक: चार किलो गांजा जप्त

जेठा कंपाऊंडमधील कारवाई

Next
ठळक मुद्दे६० हजारांच्या गांजासह रोकड जप्तकल्याणच्या जेठा कंपाऊंडमधील कारवाईगांजा तस्करी करणारी टोळी असण्याची शक्यता

ठाणे: अच्चु उर्फ अब्दुल रशिद शेख (४५, रा. बैलबाजार, कल्याण) या रिक्षा चालकाकडून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ६० हजारांचा चार किलो गांजा हस्तगत केला आहे. त्याला १९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कल्याणच्या बैल बाजार जेठा कंपाऊंड परिसरात एक रिक्षा चालक गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे जेठा कंपाऊंड भागातील गुजराती शाळेसमोरील परिसरात अच्चु उर्फ असलम याला १३ फेब्रुवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक अमृता चवरे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगमधील झडतीमध्ये ६० हजारांचा चार किलो गांजा, ८६० रुपये रोख असा ६० हजार ८६० रुपयांचा ऐवज त्याच्याकडे मिळाला. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्ट नुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने हा गांजा कोणाकडून आणला? तो कोणाला विक्री करणार होता? त्याचे आणखी कोण कोण साथीदार आहेत? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Ganges traffickers arrested from welfare: Four kg of ganja seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.