शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

लोकसभा निवडणूकीत निवडून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील दाम्पत्याची २० लाखांची फसवणूक

By जितेंद्र कालेकर | Updated: August 8, 2019 21:59 IST

गुरुदेव महाराजांकडून पूजापाठ करुन लोकसभा निवडणूकीमध्ये निवडून आणू, असा दावा करीत ठाण्यातील एका महिला उमेदवाराला २० लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. पैशांची मागणी केल्यानंतर तिच्यासह कुटूंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात मध्यप्रदेशातील सरकार उर्फ गुरुदेव महाराज याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देपूजापाठाने निवडून आणण्याची केली होती बतावणीपराभवानंतर पैशांची मागणी केल्यावर दिली ठार मारण्याची धमकीठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: आमचे सरकार उर्फ गुरुदेव महाराज हे यज्ञ पूजापाठ करुन निवडणूकीत उमेदवार निवडून आणतात, अशी बतावणी करीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या एका महिला उमेदवाराची २० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पैसे मागितल्यास तुमच्यासह कुटूंबियांनाही खल्लास करु, अशी धमकीही शर्माने त्यांना दिली आहे. याप्ररकणी नवी मुंबईतील नचिकेत जाधव, चंदीगडमधील अरविंद शर्मा आणि मध्यप्रदेशातील गुरुदेव महाराज या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.यासंदर्भात ठाण्याच्या बाळकूम, यशस्वीनगर येथील रहिवाशी असलेल्या विद्यासागर चव्हाण यांनी ७ आॅगस्ट रोजी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार १८ मार्च २०१९ रोजी ते ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीला लोकसभा निवडणूकीसाठी उभे करण्यासंदर्भात तेथील कॅन्टीनमध्ये ते फोनवरुन बोलत होते. त्यांचे हेच बोलणे ऐकल्यानंतर तिथे असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने ‘तुम्ही जर तुमची पत्नी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवार म्हणून उभे करणार असाल तर आम्ही निवडून आणू,’ अशी त्यांना बतावणी केली. नवी मुंबईतील घणसोलीमध्ये वास्तव्याला असून नचिकेत जाधव अशी त्याने आपली ओळखही सांगितली. नागपूरच्या पुढे पांडूर्णा येथे त्यांचे गुरुदेव आहेत. त्यांनी मध्यप्रदेशात ४० आमदार निवडून आणले आहेत. चंदीगडचे अरविंद शर्मा हेही यासाठी मदत करतील, अशीही त्याने बतावणी केली. सुरुवातीला मध्यप्रदेशातील पांडूर्णा येथे जाण्यासाठी विमान आणि रेल्वेच्या तिकीटासाठी त्याने ठाण्यातील कापूरबावडी येथील बिगबाजार याठिकाणी २२ मार्च २०१९ रोजी ५० हजार रुपये घेतले. २४ मार्च रोजी मध्यप्रदेशातील सरकार उर्फ गुरुदेव महाराजांना ते भेटले. तुमच्या पत्नीस लोकसभा निवडणूकीत निवडून आणून देईल, असा दावा करीत महाराजांनी एका डब्यातून त्यांना चिठ्ठी दिली. ‘चौहान साहब को सांसद बनाने के लिए १२ लाख अरविंद शर्मा को देना है और सासद बन जात हो तो पाच करोड देना है और पाच लाख खर्चा देना है,’ असे या चिठ्ठीमध्ये लिहिलेले होते. ही चिठ्ठी वाचल्यानंतर चव्हाण यांनी त्यांना होकारही दिला. त्यानंतर तुम्ही पत्नीचा तातडीने फॉर्म भरा. निवडणूकीत जिंकून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे, ती पूर्ण करु असेही शर्मा आणि जाधव यांनी फोनद्वारे त्यांना सांगितले. ९ एप्रिल रोजी त्यांनी पत्नी शुभांगी चव्हाण हिचा ठाणे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापासून ते २४ एप्रिल रोजी मतदान प्रक्रीया पूर्ण होईपर्यत नचिकेत जाधव या त्यांच्यासोबतच होता.त्याच दरम्यान १२ एप्रिल ते २७ एप्रिल २०१९ या कालावधीत त्याने निवडणूकीत शुभांगी चव्हाण यांना जिंकून आणू, असे सांगून त्यांच्याकडून २० लाख रुपये धनादेशाद्वारे घेतले. यातील शेवटचे ४ एप्रिल रोजी ५० हजार रुपये, १८ एप्रिल रोजी ५० हजार रुपये आणि २७ एप्रिलचा साडे चार लाखांचा धनादेश हे नचिकेतच्या नावाने तर उर्वरित सर्व धनादेश अरविंद शर्मा याच्या नावाने घेण्यात आले आहेत. २३ मे २०१९ रोजी मात्र लोकसभा निवडणूकीत ठाण्यातून अपक्ष उमेदवार चव्हाण यांचा पराभव झाल्याने २८ मे रोजी जाधव आणि शर्मा या दोघांकडे त्यांनी २० लाखांची रक्कम परत मागितली. त्यावर पैसे देणार नाही. तुम्ही आणि पोलीस काय करायचे ते करा. पुन्हा पैसे मागाल तर तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबियांना खल्लास करु, अशी शर्माने त्यांना धमकी दिली. याच प्रकाराने घाबरुन चव्हाण यांनी तक्रारही केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी काूपरबावडी पोलीस ठाण्यात नचिकेत जाधव, अरविंद शर्मा आणि गुरुदेव महाराज (रा. मध्यप्रदेश) या तिघांविरुद्ध फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक ए. टी. वाघ याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी