शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Thane: पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहेत, श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांना टोला

By अजित मांडके | Updated: April 15, 2024 14:29 IST

Lok Sabha Election 2024: संजय राऊत यांच्या आरोपावर हसायचे  की रडायचे हेच समजत नाही.पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहे. असा टोला शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना लगावला.

- अजित मांडके  ठाणे  - संजय राऊत यांच्या आरोपावर हसायचे  की रडायचे हेच समजत नाही. पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहे. असा टोला शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना लगावला. संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यामाध्यमातून 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चोकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. त्यावर श्रीकांत शिंदेनी बोलतांना हा टोला लगावला. 

संजय राऊत यांनी काय पत्र पाठवले ते  मी  वाचले नाही. मात्र आमच्या फाउंडेशनची इत्यंभूत माहिती त्यांनी  ठेवली आहे.राऊत यांना शिव्या शाप  शिवाय दुसरे सुचत नाही. अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली.त्यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र दिले त्यांचा विश्वास पंतप्रधान यांच्यावरती वाढला आहे. हे यावरून दिसून येत आहे. असे शिंदे म्हणाले.पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी जे  जेल मध्ये जाऊन आलेले आहे. तेच पत्र लिहीत आहेत. तसेच खिचडी घोटाळा आरोपी कुटुंबीयांच्या खात्यात पैसे आले.असे शिंदे म्हणाले.तुम्ही आजपर्यंत  कोणाला मदत केली आहे का? असा सवाल शिंदे यांनी विचारला. तसेच पत्रके घर मे रहने वाले दुसरे को पत्र लिखा नही करते. असा टोलाही शिंदे यांनी राऊत यांना लगावला.राऊत यांनी पंतप्रधान यांना पाठवलेल्या पत्रामधील  तपशील मोघम आहे. असे म्हणत आज कोणतीच गोष्ट माहितीच्या अधिकारा  मध्ये लपत नाही.असे सांगत काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अशी टीका शिंदे यांनी केली.त्यांच्यासाठी चांगला डॉक्टर बघा त्याची देखील मदत वैद्यकीय कक्ष घ्यायला तयार आहे.त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च  वैद्यकीय कक्ष करेल. असे शिंदे यांनी सांगितले

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shrikant Shindeश्रीकांत शिंदेSanjay Rautसंजय राऊत