शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाला ठाण्यातील लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 13:53 IST

महासभेत घटनेचा निषेध व्यक्त, महासभा केली पूर्णवेळ तहकुब. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्वाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेच्या वतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे  महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर अधिकारी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. अतिशय वाईट पद्धतीने हा हल्ला पिंपळे यांच्यावर करण्यात आला असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी एमएमआर रिजनमधील सर्व महापालिका आणि नगर पालिकांमधील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी एक दिवस काम बंद अंदोलन केले. ठाण्यातील लोकप्रतिनिधींनी देखील बुधवारी झालेल्या महासभेत या आंदोलनाला पाठींबा देत पूर्णवेळ महासभा तहकुब केली.

         मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्वाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेच्या वतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी एमएमआर रिजन मधील महापालिका आणि नगरपालिकांमधील अधिकारी आणि कर्मचा:यांची संख्या ४० हजारांच्या घरात असून यामुळे कामावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मात्न या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात मानसिक खच्चीकरण झाले असल्याची भावना या अधिका:यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळेचे हे कामबंद आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

     दरम्यान बुधवारी झालेल्या महासभेत भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी या संदर्भात सभातहकुबी मांडली होती. सहाय्यक आयुक्तांवर झालेला हा हल्ला प्राणघातकी होता, त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करीत महासभा तहकुब करण्याची मागणी केली. त्याला शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के यांनी अनुमोदन दिले. तर महापौर नरेश म्हस्के यांनी या घटनेचा निषेध करीत बुधवारी एमएमआर रिझनमध्ये सर्वानीच काम बंद आंदोलन केले असल्याचे सांगितले. त्यानुसार ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी देखील काम बंद ठेवले आहे. तसेच त्यांच्या संघटनेकडून देखील मला निवेदन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सभागृहात चर्चा करण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत ही महासभा पूर्णवेळ तहकुब करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका