शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! एका महिन्यात रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दुपटीच्या जवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 18:49 IST

लसीकरणाचा वेग वाढविल्याने ठाण्यात मेच्या संपूर्ण महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा स्तर खाली आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता पुन्हा ९७ टक्यांवर आले आहे.

ठाणे  : कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणि पालिकेने सुरु केलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे आणि लस कमी प्रमाणात मिळत असतांनाही लसीकरणाचा वेग वाढविल्याने ठाण्यात मेच्या संपूर्ण महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा स्तर खाली आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता पुन्हा ९७ टक्यांवर आले आहे. ठाणेकरांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे.

विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात कोरोनाचे नवे तब्बल ४१  हजार २५ रुग्ण आढळले होते. तर मे महिन्यात केवळ १० हजार ७४७ नवे कोरोना रुग्ण आढळले असून याच कालावधीत तब्बल १८ हजार २८३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. तर याच कालावधीत २४१ रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधी हा थेट ७०७ दिवसांवर गेला आहे.

ठाणे  महापालिका हद्दीत आतार्पयत १ लाख २९ हजार ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १ लाख २५ हजार ७१० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याचेही दिसून आले आहे. तर एप्रिल अखेर प्रत्यक्ष उपचार घेणा:या रुग्णांची संख्या १० हजार १३ एवढी होती. ती सद्याच्या घडीला केवळ १५३० एवढी दिसून आली आहे. फेब्रुवारी अखेर पासून ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतांना दिसत होती. रुग्णांना बेड मिळणो देखील कठीण झाले होते. त्यातही रुग्णांचा मृत्यु देखील वाढतांना दिसत होता. त्यातही महापालिकेच्या माध्यमातून वर्षभरात १६ लाख ४३ हजार ६४४ नागरीकांची कोरोना चाचणी केली आहे. तर आजही दिवसाला ३ हजारांच्या आसपास चाचणी केल्या जात आहेत.

परंतु दुसरीकडे आता मागील महिनाभरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढतांना दिसून आले आहे. मागील एप्रिल अखेर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९० टक्के होते. तेच आता ९७ टक्यांवर आले आहे. ठाण्यासाठी निश्चितच ही चांगली गोष्ट म्हणावी लागणार आहे. ठाणो महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. एकाला बाधा झाली तर त्याच्या संपर्कातील ३७ जणांना विलगीकरणात ठेवले जात आहे. त्यातही लॉकडाऊनमुळे देखील आता रुग्ण दरवाढीची संख्या कमी होतांना दिसत आहे.

मागील काही दिवसात रुग्ण दरवाढीचा वेग काहीसा कमी झाल्याचे दिसत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. एप्रिल महिन्यात शहरात ४१ हजार २५ नवे रुग्ण आढळले असून या कालावधीत १६३ रुग्णांचा मृत्यु झाला होता. याच कालावधीत तब्बल ३९ हजार ८०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. परंतु मे महिन्यात नवे रुग्ण अवघे १० हजार ७४७ एवढे आढळून आले आहेत. तर याच कालावधीत तब्बल १८ हजार २८३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे दिसून आले. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असतांना दुसरीकडे मे महिन्यात २४१ जणांचा मृत्यु झाल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे ही थोडीशी चिंतेची बाब असली तरी देखील मृत्यु दर कमी करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस