शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

''आई शप्पथ...ठाण्यात राहण्याची अजिबात इच्छा नाही'', भाजपा नगरसेवकांवर वैतागले मनपा आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 12:27 IST

आता सभागृहानेच माझ्या विरोधात अविश्वास ठराव करावा आणि मला येथून परत पाठवावे. आई शप्पथ या ठरावाला मी कोणताही विरोध करणार नाही

ठाणे : ज्यांनी माझा ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसीडर म्हणून वापर केला, ज्यांच्या नजरेत मी कालपर्यंत हीरो होतो, त्यांनीच मला आज झिरो केले आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका करुन माझ्या बदलीसाठी प्रयत्न केले जात असल्याचा अप्रत्यक्ष टोला ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भाजपाला लगावला. परंतु मलाच इथे राहण्याची अजिबात इच्छा नाही, शासन देखील माझी बदली करीत नाही, त्यामुळे आता सभागृहानेच माझ्या विरोधात अविश्वास ठराव करावा आणि मला येथून परत पाठवावे. आई शप्पथ या ठरावाला मी कोणताही विरोध करणार नसल्याचे भावनिक आवाहन ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले. परंतु एप्रिल पर्यंत बदली झाली नाही तर मी सुट्टीवर जाईन असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.मंगळवारी महासभा सुरु होताच, मुंब्रा स्टेडीयमचा मुद्यावरुन राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये चांगलेच वातावरण तापले होते. तसेच याच महासभेत भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी पोलिसांना बाईक देण्याच्या प्रकरणावरुन सभा तहकुबी मांडली होती. त्यामुळे प्रशासनातील सर्वच अधिकारी चिंतेत होते. त्यात मुंब्य्राच्या स्टेडीअमवर सुरु असलेल्या वादाच्या वेळेस देखील भाजपाच्या नगरसेवकाने प्रशासनाने मोबाईलवर वाचलेल्या पत्रावर आक्षेप घेतल्याने आयुक्त संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी बदलीसाठी भावनिक आवाहन केले. स्थायी समिती नसल्याने ३५ (अ) नुसार प्रशासकीय वित्तीय मान्यतेचे विषय हे महासभेच्या पटलावर येत असतात. त्यामुळेच महासभेत विषय वाढले जात आहेत. परंतु, त्यातही काही घटक प्रशासनावर बोट ठेवत आहेत हे चुकीचे आहे. तीन वर्षे मी माझे घरदार विसरुन शहराचा विकास व्हावा यासाठी दिवस रात्र प्रयत्न केले. परंतु आॅक्टोबर महिन्यात माझ्यावर ज्या पध्दतीने वयक्तीक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासूनच मी व्यतीथ होतो. त्यामुळे माझी बदली व्हावी यासाठी मी प्रयत्न करीत होतो. परंतु माझी बदली झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. काही घटकांनी माझ्या विरोधात वातावरण तयार करुन मला बदनाम करण्याचे कारस्थानही रचले. काहींनी तर माझी बदली व्हावी यासाठी प्रयत्न देखील केले. तीन वर्षात ज्या घटकांनी माझा वापर ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसीडेर म्हणून केला, ज्यांनी मला हिरो ठरविले. त्याच लोकांनी माझ्यावर वयक्तीक टिका करुन एका क्षणात झिरो ठरविल्याचा अप्रत्यक्ष टीका त्यांनी भाजपावर केली. मला हुकमशहा, औरंगजेब अशी देखील माझ्यावर टिका झाली. मी संवेदनशील असल्याने मला याचे दुख होत आहे. माझी इमेज डाऊन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मला त्याचे सर्वात जास्त दुख होत असल्याचेही त्यांनी सांगितले. भांडणे कोणाची नाही होत, माझे देखील सभागृहातील सदस्यांबरोबर कित्येक वेळेला भांडण झाले आहे. परंतु मी कधीही ते वयक्तीक पातळीवर नेले नाही. परंतु माझ्या विरोधात काही घटक अशा पध्दतीने कृत्य करीत असले तरी जनतेच्या मनात माझे रिपोर्ट कार्ड तयार आहे. त्यामुळे मला टिकेची मुळीच चिंता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुळात मलाच येथे राहयाचे नाही, त्यासाठी आजपासूनच मी सुट्टीवर जाणार होतो. परंतु रात्री मला एकाने आश्वासन दिल्याने मी सुट्टी रद्द केली आहे. परंतु एप्रिल पर्यंत माझी बदली झाली नाही, तर मात्र जो पर्यंत माझ्या बदलीची आॅर्डर येत नाही, तो पर्यंत मी सुट्टीवर जाईन असा इशाराही त्यांनी दिला. शासन माझी बदली करीत नाही, त्यामुळे आता सभागृहानेच माझ्या विरोधात अविश्वास ठरुन करुन मला शासनाकडे पाठवावे, आई शप्पथ जे असा ठराव करतील त्यांचे मी मनापासून आभार मानने असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका