ठाणे शहराची पाणी कपात तुर्तास रद्द, ठाणेकरांसाठी आनंद वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 04:25 PM2019-07-04T16:25:58+5:302019-07-04T16:28:14+5:30

मागील काही दिवसापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे ठाणेकरांची पाणी कपात तुर्तास रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरली आहे.

Thane city announces disconnection of water, Anand talks for Thane | ठाणे शहराची पाणी कपात तुर्तास रद्द, ठाणेकरांसाठी आनंद वार्ता

ठाणे शहराची पाणी कपात तुर्तास रद्द, ठाणेकरांसाठी आनंद वार्ता

Next
ठळक मुद्देबुधवारी केली जात होती कपातपावसाने पाठ फिरविल्यास पुन्हा कपात

ठाणे - मागील काही महिने ठाणेकरांचे पाण्याविना हाल सुरु होते. परंतु आता पावसाने ठाण्यासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने ठाणे शहराची पाणी कपात तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली आहे. परंतु पावसाने पाठ फिरविल्यास पुन्हा पाणी कपात केली जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. असे असले तरी ठाणेकरांना जोपर्यंता पाऊस आहे, तो पर्यंत पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही.
              ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील पाणी पुरवठा हा बुधवार ते गुरुवार असा २४ ते ३० तास बंद ठेवण्यात येत होता. यंदा तर ही पाणी कपात सप्टेंबर २०१८ पासूनच लागू करण्यात आली होती. सुरवातीला १४ टक्के त्यानंतर २० टक्के आणि आता तब्बल ३० टक्के पाणी कपात ठाणे शहरात केली जात होती. परंतु त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात होता. पाण्याच्या या कपातीवरुन महासभेतही अनेक वेळा आवाज उठविण्यात आला होता. पाण्यासाठी आंदोलनही झाल्याचे पहावयास मिळाले होते.
दरम्यान आता मागील काही दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाऊस असा पडत राहिला तर धरणांच्या पातळीतही लवकरच वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु मागील काही दिवसापासून पावसाने लावलेल्या सततच्या हजेरीमुळे शहरातील पाणी कपात तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली आहे. जो पर्यंत पावसाची अशीच कृपा राहिल तो पर्यंत कपात होणार नसल्याचेही पालिकेच्या सुत्रांचे म्हणने आहे. अद्याप धरणांच्या पातळीत वाढ झालेली नाही, तलावांमध्येही पुरेसा पाणी साठा नाही. परंतु सलग पडणाऱ्या पावसामुळे हा दिलासा दिला जात असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. परंतु पावसाने पाठ फिरविल्यास पुन्हा पाणी कपात करावी लागेल असेही पालिकेने स्पष्ट केले.

 

Web Title: Thane city announces disconnection of water, Anand talks for Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.