शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ठाणे : दहीहंडी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह मंत्री लावणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 15:41 IST

मराठी संस्कृतीचे जतन करताना सामाजिक बांधिलकी जपून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्धार करीत स्वामी प्रतिष्ठानतर्फे साजरा होणाऱ्या सामाजिक समरसता दहीहंडीमध्ये केरळमधील पूरग्रस्त आणि महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मिळून 7 लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले जाईल.

ठाणे - मराठी संस्कृतीचे जतन करताना सामाजिक बांधिलकी जपून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्धार करीत स्वामी प्रतिष्ठानतर्फे साजरा होणाऱ्या सामाजिक समरसता दहीहंडीमध्ये केरळमधील पूरग्रस्त आणि महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मिळून 7 लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले जाईल. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या ठाण्यातील दहा आदिवासी विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती ही आकर्षण ठरणार असल्याची माहिती भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघाचे अध्यक्ष व स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

ठाण्यातील हिरानंदानी मिडोज चौक, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्ययगृहासमोर स्वामी प्रतिष्ठान तर्फे सर्व नियमांचे पालन करुन हा दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. मराठमोळ्या संस्कृतीचे जतन, प्रचार करताना सामाजिक बांधिलकीचे भान जपण्याचे प्रयत्न दहीहंडी उत्सवातून केले जाणार आहे. ठाण्यातील या दहीहंडीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असून गोविंदांचा उत्साह वाढविणार आहेत.  मुंबईतील सर्व गोविंदा पथकांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांचा विमा काढण्यात येणार आहे. सर्वात मोठी हंडी लावणाऱ्यांना 11 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून विविध थरांना सुमारे 50 लाख रुपयांच्या पारितोषिकांची लयलूट स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात करण्यात येणार आहे. याचवेळी केरळमधील पूरग्रस्तांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सात लाख रुपये दिले जाणार आहेत. हा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाणार आहे.

यावेळी ठाणेकरांच्या मनोरंजनासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री हे आपली कला सादर करणार आहेत, असे शिवाजी पाटील यांनी सांगितले. 3 सप्टेंबरला सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत होणाऱ्या दहीहंडीच्या आदल्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबरला सेलिब्रेटींची दहीहंडी होणार आहे. यावेळी सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, रुपाली भोसले, मीरा जोशी, केतकी चितळे, राधा कुलकर्णी, स्मिता शेवाळे, सिया पाटील, मधुरा देशपांडे, प्रिती सदाफुले आणि माधवी निमकर हे कलाकार तसेच अभिजीत कोसंबी आणि इतर चार गायक कलाकार यात सहभागी होणार आहेत.

सर्व ठाणेकर, गोविंदांनी या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दहीहंडी उत्सहात सामिल होऊन प्रेमाचा संदेश देण्याचे आवाहन स्वामी प्रतिष्ठानकडून केले जात असल्याचे आयोजक शिवाजी पाटील, निमंत्रक अॅड. संदीप लेले आणि आमदार अॅड निरंजन डावखरे यांनी केले आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस