शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील बिल्डर दाम्पत्याने सदनिका विक्रीच्या नावाखाली केली ५० लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 19:54 IST

एकच सदनिका अनेकांना विकून त्यापोटी लाखो रुपये उकळण-या कथित बिल्डर दाम्पत्यांविरुद्ध ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देसदनिका न देताच रोकड आणि पैसे उकळलेएकच सदनिका अनेकांना विकल्याचा देखावाप्रत्यक्षात पैसे आणि घरही न दिल्याने तक्रार दाखल

ठाणे: सदनिका विक्रीच्या नावाखाली भिवंडीच्या काल्हेर येथील अनिलकुमार सिंग (४८) यांना बिरेंद्र पुजारा आणि तुलसी पुजारा या दोघांची ३९ लाख २५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार कापूरबावडी भागात घडला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिलकुमार आणि त्यांच्या भावाला भिवंडीतील गोवेगाव येथील ‘तुळशीधाम’ या इमारतीमध्ये एक सी ००८, १०१, १०४ आणि २०८ या क्रमांकाच्या तीन सदनिका देतो अशी पुजारा यांनी बतावणी केली होती. त्यांचा हा सौदा ३९ लाख २५ हजारांमध्ये ठरला होता. त्यातील दहा लाख ७५ हजारांची रोकड अनिलकुमार यांनी कापूरबावडीतील लेक सिटी मॉल येथील दुसºया मजल्यावरील एका गाळयामध्ये दिली होती. तर उर्वरित रक्कम ३९ लाख २५ हजार रुपये धनादेशाद्वारे बँकेतून घेऊन विरेंद्र आणि तुलसी यांनी अनिलकुमार यांनी खरेदी केलेल्या वरील चारही सदनिका त्यांना न देता त्यांची आपसात संगनमत करुन बनावट कागदपत्रे तयार केली. नंतर या चारही सदनिका इतर व्यक्तींना विकल्या. त्यांच्याकडूनही पैसे घेऊन त्यांनाही या सदनिका न देता त्यांचीही फसवणूक केली. हा प्रकार ३० जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१७ या दोन वर्षांच्या काळात घडला. अशा प्रकारे एकाच फ्लॅटवर अनेकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी पुजारा यांच्याविरुद्ध अनिलकुमार यांनी ३० जानेवारी २०१८ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्यामुळे कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक एन. बी. गिरासे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे