शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Thane: मुंबई मनपा पाणी कपातीचा फटका ठाण्याला कपातीचा फटका बसू नये यासाठी ठाणे मनपाने केले नियोजन

By अजित मांडके | Updated: February 27, 2024 16:15 IST

Thane News: देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील काही भागात आठवड्यातून १५ दिवसातून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पाणी कपात केली जात आहे. परंतु आता मुंबई महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू करण्यात आली असल्याने त्याचा फटका देखील ठाण्यातील बहसुंख्य भागांना बसणार आहे.

- अजित मांडके  ठाणे - देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील काही भागात आठवड्यातून १५ दिवसातून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पाणी कपात केली जात आहे. परंतु आता मुंबई महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू करण्यात आली असल्याने त्याचा फटका देखील ठाण्यातील बहसुंख्य भागांना बसणार आहे. त्यामुळे ज्या भागांना पाणी कपातीचा फटका बसणार आहे. त्याठिकाणी पाणी पुरवठ्याचे नियोजन ठाणे महापालिकेने केले आहे. त्यानुसार ज्या भागांना दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी पुरवठा केला जात आहे. त्याभागांना आता पुढील काही दिवस दिवसातून एकदा दोन तास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन ठाणे महापालिकेने आखले आहे.

मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठयाच्या पिसे येथील पाणी उद्चंन केंद्रामध्ये अचानक आग लागल्याने मुंबईतील अनेक भागांचा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. त्यानुसार सोमवारी रात्रीपासूनच मुंबई महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू केली आहे. त्यानुसार त्याचा फटका आता ठाणे शहरातील बहुसंख्य भागांना बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेकडून ठाण्याला रोज ८५ दशलक्ष लीटर एवढा पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु आता मुंबई महापालिकेने ठाण्यात देखील ५० टक्के पाणी कपात लागू केली आहे. जो पर्यंत काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत ही कपात लागू असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या पाणी कपातीचा सामना आता शहरातील धोबी घाट कोपरी पूर्व, आनंद नगर गांधी नगर, नौपाडा, बी कॅबीन, राम मारुती रोड टेकडी बंगला, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, वागळे इस्टेट, साईनाथ नगर, रघुनाथ नगर, अंबिका नगर, जिजामाता नगर, रामंचद्र नगर, इंदिरा नगर आदी भागांना याचा फटका बसणार आहे.

येथील बहुसंख्य भागांना दिवसातून दोन किंवा तीन वेळा पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु येथील रहिवाशांना पाणी कपातीचा अधिकचा फटका बसू नये यासाठी महापालिकेने उपाय योजना आखल्या आहेत. त्यानुसार येथील भागांना आता दिवसातून एकदाच दोन तास पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार गावदेवी येथील पाण्याची टाकी भरल्यानंतर येथील भागांना पाणी पुरवठा आणि टेकडी बंगला येथील पाण्याची टाकी भरल्यानंतर तेथील भागांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

टॅग्स :WaterपाणीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका