Thane: सुषमा अंधारेंविरोधात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचा दिवा बंद 

By अजित मांडके | Updated: December 17, 2022 14:10 IST2022-12-17T14:09:34+5:302022-12-17T14:10:18+5:30

Thane: महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच संतांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हिंदू संतांच्या विरुद्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून वारकरी संप्रदायाकडून आज ठाणे बंदची हाक देण्यात आली होती.

Thane: BJP and Hindutva organizations shut down the lights | Thane: सुषमा अंधारेंविरोधात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचा दिवा बंद 

Thane: सुषमा अंधारेंविरोधात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचा दिवा बंद 

- अजित मांडके
ठाणे  - सुषमा अंधारे यांच्या हिंदू विरुद्ध वक्तव्या विरोधात भाजपने पुकारलेल्या दिवा बंद करण्यात आला.  महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच संतांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हिंदू संतांच्या विरुद्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून वारकरी संप्रदायाकडून आज ठाणे बंदची हाक देण्यात आली होती.

  या बंदला ठाणे शहर जिल्हा भाजप कडून पाठिंबा दर्शवण्यात आला होता ठाणे शहर अध्यक्ष आमदार ऍड. निरंजन डावखरे व ठाणे शहर आमदार संजय केलकर यांच्या नेतृत्वात आज दिव्यालाही दिवा भाजपकडून बंद पाळण्यात आला या बदला दिव्यातील जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला दिवा भाजप व हिंदू संघटना यांच्याकडून सुषमा अंधारे यांच्या प्रतिमात्मक पुतला जाळून निषेध करण्यात आला यावेळी दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे ठाणे शहर ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद भगत सरचिटणीस युवराज यादव दिवा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर महिला अध्यक्ष ज्योती पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अजय सिंग गुजराती सेल अशोक सोलंकी व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर प्रवीण पाटील पंकज सिंग अवधराज राजभर वीरेंद्र गुप्ता दीपक गुप्ता धर्मेंद्र विश्वकर्मा राजा आंब्रे आनंदा पाटील अमन गुप्ता दिनेश गुप्ता आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Thane: BJP and Hindutva organizations shut down the lights

टॅग्स :thaneठाणे