ठाणे झाले हागणदारीमुक्त!
By Admin | Updated: April 1, 2017 03:58 IST2017-04-01T03:58:07+5:302017-04-01T03:58:07+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे पालिकेने राबविलेल्या अभियानानामुळे रेल्वे हद्द आणि संजय गांधी राष्ट्रीय

ठाणे झाले हागणदारीमुक्त!
ठाणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे पालिकेने राबविलेल्या अभियानानामुळे रेल्वे हद्द आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग वगळता संपूर्ण ठाणे शहर हागणदारीमुक्त झाले आहे.
ठाणे शहरात २०११ सालच्या जनगणनेनुसार ११,८४३ कुटुंबे उघड्यावर बसत होती. २०१५च्या सर्वेक्षणामध्ये हे प्रमाण कमी होऊन ६,९६८ कुटुंबे उघड्यावर शौचास बसत असल्याचे आढळून आले. ठामपाने या पार्श्वभूमीवर जनजागृतीद्वारे वैयक्तिक आणि सामूहिक शौचालयांसाठी नागरिकांना प्रोत्साहित केले. ठामपाने ७ हजार कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधणीस निधी उपलब्ध करून दिला आहे. सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांचे ३ वर्षांत ११२९२ सीट्सचे काम केले. विविध ३० ठिकाणी वातानुकूलित तर १४ ठिकाणी महिलांसाठी विशेष शौचालये बांधली जाणार आहेत. (प्रतिनिधी)