शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ठाण्यातील आॅटोमोबाईल कंपनीची ४२ लाखांची फसवणूक: दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 23:18 IST

ठाण्यातील साई पॉर्इंट आॅटोमोबाईल या कंपनीची ४२ लाख ५० हजार ३९९ रुपयांची फसवणूक करणाऱ्या पुष्पक रांका आणि विधी अरोरा या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्दे नौपाडा पोलिसांची कारवाईवीम्याचे कमिशनही हाडपल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील साई पॉर्इंट आॅटोमोबाईल या कंपनीची ४२ लाख ५० हजार ३९९ रुपयांची फसवणूक करणाºया पुष्पक रांका आणि विधी अरोरा या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. यातील अरोरा याला ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर रांका याला १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पक रांका याने त्याची पत्नी रश्मी रांका तसेच आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीचे व्यवस्थापक विधी अरोरा आणि त्यांची पत्नी रुपाली कदम या चौघांनी मिळून साई पॉर्इंट आॅटोमोबाईल कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या चौघांनीही या कंपनीमध्ये एका कंटेनरमधून आलेल्या १९ लाखांच्या ४० दुचाकींची परस्पर विक्री केल्याचा आरोप असून वीमा कंपनीकडून साई पॉर्इंट आॅटोमोबाईल कंपनीला वीम्यापोटी दिले जाणारे कमिशनही परस्पर लाटले. कमिशन आणि ४० दुचाकी मिळून सुमारे ४२ लाख ५० हजारांचा अपहार केल्याची तक्रार साई पॉर्इंट आॅटोमोबाईल कंपनीच्या वतीने विनोद शेट्टी (३८) यांनी ७ नोव्हेंबर २०२० रोजी दाखल केली. हा प्रकार १९ आॅक्टोबर २०१६ ते मार्च २०२० या चार वर्षांच्या कालावधीमध्ये घडला. याप्रकरणी पुष्पक रांका, रश्मी रांका, विधी अरोरा आणि रुपाली कदम या चौघांविरुद्ध फसवणूक आणि अपहाराची तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या पथकाने २१ नोव्हेंबर रोजी पुष्पक रांका याला तर अरोरा याला २९ नोव्हेंबर रोजी अटक केली. याप्रकरणी सखोल चौकशी सुरु असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले..

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी