शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

चार बांग्लादेशी महिलांना ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 19:02 IST

अवैध मार्गाने भारतात घुसखोरी करून भिवंडी येथे वास्तव्य करणाऱ्या चार बांग्लादेशी महिलांना ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने गुरूवारी रात्री भिवंडी येथून अटक केली.

ठळक मुद्देचारही आरोपींना पोलीस कोठडीआश्रयदात्यांचीही चौकशी करणारवरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांची माहिती

ठाणे : बांग्लादेशातून घुसखोरी करून भिवंडीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार महिलांना ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली. भिवंडी येथे गुरूवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.बांग्लोदशी घुसखोर महिलांची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना गुरूवारी मिळाली. त्यानुसार रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांच्यासमवेत सहायक पोलीस निरीक्षक सतीश वाळके, पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हांडके, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू महाले आणि महिला कर्मचाऱ्याच्या पथकाने भिवंडी येथील कन्हेरी रोडवरील हनुमान टेकडी परिसरात छापा टाकला. यावेळी रूमा फारूख शेख, रूकीम जलाल शेख, नजमा कबीर शेख आणि रत्ना हनीफ शेख यांना पोलिसांनी अटक केली. नजमा कबीर शेख ही जवळपास आठ वर्षांपासून भारतात अवैधरित्या वास्तव्य करून आहे. उर्वरित तीन महिलांनी साधारणत: ६ ते ८ महिन्यांपूर्वी घुसखोरी केली. तीन महिला मुळच्या बांग्लादेशातील नरसिंबी जिल्ह्याच्या तर एक महिला गाजीपूर जिल्ह्याची आहे. चारही महिला या भागात वेश्या व्यवसाय करीत होत्या. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याजवळ भारतातील वास्तव्याबाबत एकही अधिकृत पुरावा आढळला नाही. एवढ्या दिवसांपासून या भागात आरोपी महिलांना ज्यांनी आश्रय दिला, त्यांची चौकशी त्यांच्याविरूद्धही कारवाई केली जाणार असल्याची माहिती रवींद्र दौंडकर यांनी दिली. चारही आरोपींना न्यायालयाने २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा