Thane: उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शिशिर शिंदे करणार प्रवेश

By अजित मांडके | Updated: July 3, 2023 13:07 IST2023-07-03T13:06:49+5:302023-07-03T13:07:14+5:30

Thane: एकीकडे राष्ट्रवादी मध्ये फुटीचे वारे वाहू लागले असताना आता शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे.

Thane: Another blow to the Uddhav Thackeray faction, Shishir Shinde will enter | Thane: उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शिशिर शिंदे करणार प्रवेश

Thane: उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शिशिर शिंदे करणार प्रवेश

- अजित मांडके
ठाणे - एकीकडे राष्ट्रवादी मध्ये फुटीचे वारे वाहू लागले असताना आता शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे गटातील शिशिर शिंदे हे आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रम येथे जाहिर प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची गळती आणखी वाढत असल्याचे दिसत आहेत.

दोन दिवसांपूर्वी मुबंईत आदित्य ठाकरे यांचे समर्थक समजले जाणारे राहुल कनाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज दुपारी उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी देखील शिवसेनेत जाहिर प्रवेश करणार आहेत. याशिवाय सुनील राऊत यांचे निकटवर्ती समजले जाणारे सम्पर्क प्रमुख विलास पारकर यांच्यासह मराठी सिनेकलावंत देखील प्रवेश करणार असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले.

Web Title: Thane: Another blow to the Uddhav Thackeray faction, Shishir Shinde will enter