ठाणे : दरवाजा बंद झाल्याने घरात अडकलेल्या वृद्धेची सुखरुप सुटका, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

By जितेंद्र कालेकर | Updated: February 3, 2023 18:56 IST2023-02-03T18:55:22+5:302023-02-03T18:56:02+5:30

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मदतकार्य

Thane An old woman locked in the house due to the door being closed was rescued safely admitted to the hospital for treatment | ठाणे : दरवाजा बंद झाल्याने घरात अडकलेल्या वृद्धेची सुखरुप सुटका, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

ठाणे : दरवाजा बंद झाल्याने घरात अडकलेल्या वृद्धेची सुखरुप सुटका, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

ठाणे: दरवाजा अचानक बंद झाल्याने ७५ वर्षीय जयश्री रमाणे या  जखमी अवस्थेत घरात अडकल्या होत्या. रमाणे या कासारवडवली येथील हावरे सिटीमधील इमारतीमध्ये राहत असून रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून सुखरुप सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कासारवडवली येथील अटलांटिक इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील ५०२ क्रमांकाच्या सदनिकेत रमाणे कुटूंब वास्तव्याला आहे. या खोलीचा दरवाजा अचानक लॉक झाल्याची माहिती रमाणे कुटूंबीयांकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली होती.

त्याच माहितीच्या आधारे या विभागाने ओवळा अग्निशमन दलाच्या मदतीने जखमी अवस्थेत घरात अडकलेल्या या वृद्धेची सुटका केली. त्यानंतर नातेवाईकांमार्फत पोखरण रोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Thane An old woman locked in the house due to the door being closed was rescued safely admitted to the hospital for treatment

टॅग्स :thaneठाणे