शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एकाच शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; बदलापूरमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 17:13 IST

Thane Crime News: बदलापूर मध्ये एकाच शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषण झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही.

- पंकज पाटील बदलापूर - बदलापूर मध्ये एकाच शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषण झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही.

बदलापूर शहरात संस्कृतीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर नराधमाने अत्याचार केले आहेत. या प्रकरणात एका मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुली प्रसाधनगृहात जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याने संतापजनक प्रकार मुलींसोबत केला आहे. दोन्ही मुलींनी पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 12 ते 13 ऑगस्ट ला हा प्रकार घडला होता. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाला माहिती दिल्यावर मुलींची खाजगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणी नंतर मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. बदलापूर शहरात काही दिवसांपूर्वीच एका बारा वर्षे मुलीवर सुद्धा अत्याचार झाला होता. याचा अजून पोलिसांना तपास लागलेला नाही. त्यातच आता हा समाजाला काळीमा फासणारा प्रकार घडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

- बदलापुरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडल्यामुळे शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थी देखील नराधमापासून संरक्षित राहू शकत नाही ही बाब समोर आली आहे.- दरम्यान या प्रकार त्या चिमुकला विद्यार्थिनी आपल्या बालकांना सांगितल्यामुळे उघडतीस आला आहे त्यामुळे याआधी इतर कोणत्या विद्यार्थिनी सोबत असा प्रकार घडला आहे काय याची चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.- दरम्यान हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता त्यांना तब्बल 12 तास रखडवून ठेवण्यात आले आणि बारा तासानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. 

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणेCrime Newsगुन्हेगारी