ठामपाचा गणपती यंदाही दीड दिवसांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST2021-08-26T04:43:20+5:302021-08-26T04:43:20+5:30

ठाणे : कोरोनाच्या नियमांचे पालन करून यंदादेखील ठाणे महापालिकेचा गणेशोत्सव दीड दिवसांचाच होणार असल्याची माहिती महापौर नरेश ...

Thampa's Ganpati is still one and a half days old | ठामपाचा गणपती यंदाही दीड दिवसांचाच

ठामपाचा गणपती यंदाही दीड दिवसांचाच

ठाणे : कोरोनाच्या नियमांचे पालन करून यंदादेखील ठाणे महापालिकेचा गणेशोत्सव दीड दिवसांचाच होणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत नमूद केली.

ठाणे महापालिकेच्यावतीने ३९ वी श्री गणेश मंडळाची सर्वसाधारण सभा बुधवारी महापौर दालनात पार पडली. यावेळी ठामपा गणेशोत्सव मंडळाने सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. तसेच ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त या पदावर संदीप माळवींसह गेली ३९ वर्षे अविरतपणो गणेशोत्सव मंडळाची सेवा केल्याबद्दल मंडळाचे कार्यवाहक आर. के. पाटील यांचादेखील महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावरील जागेमध्ये अत्यंत साधेपणाने श्री मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.

Web Title: Thampa's Ganpati is still one and a half days old