ठामपाच्या लिपिकाला ४५ हजारांची लाच स्वीकारताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:42 AM2021-04-20T04:42:00+5:302021-04-20T04:42:00+5:30

ठाणे : तीन वर्षांच्या कालावधीतील एलबीटी टॅक्स कमी करण्याच्या मोबदल्यात ५० हजारांची मागणी करुन ४५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या शरद ...

Thampa clerk arrested for accepting bribe of Rs 45,000 | ठामपाच्या लिपिकाला ४५ हजारांची लाच स्वीकारताना अटक

ठामपाच्या लिपिकाला ४५ हजारांची लाच स्वीकारताना अटक

Next

ठाणे : तीन वर्षांच्या कालावधीतील एलबीटी टॅक्स कमी करण्याच्या मोबदल्यात ५० हजारांची मागणी करुन ४५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या शरद उघाडे (५५) या ठाणे महापालिकेच्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (एसीबी) रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यातील एका व्यापाऱ्याच्या मालकीचा ठाणे येथे स्टेशनरीचा व्यवसाय आहे. २०१३ ते २०१६ या वर्षाचा एलबीटी टॅक्स कमी केल्याचा मोबदला म्हणून ठामपाचे लिपिक शरद उघाडे यांनी त्यांच्याकडे ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली होती. याच तक्रारीची १९ एप्रिल २०२१ रोजी एसीबीकडून पडताळणी करण्यात आली. तेव्हा ही मागणी केल्याचे उघड झाल्याने एसीबीने सोमवारी ठाणे महापालिकेच्या माजीवडा येथील एलबीटी कार्यालयात सापळा लावला. याच सापळ्यात उघाडे यांना ४५ हजारांची लाच स्वीकारताना कार्यालयातच रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Thampa clerk arrested for accepting bribe of Rs 45,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.