ठामपाचे मुख्यालयही धोकादायक
By Admin | Updated: August 10, 2015 23:41 IST2015-08-10T23:41:10+5:302015-08-10T23:41:10+5:30
आता ठाणे महापालिकेचे मुख्यालयही धोकादायक इमारतींच्या यादीत आले आहे. त्यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेऊन महापालिकेने या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठामपाचे मुख्यालयही धोकादायक
ठाणे : आता ठाणे महापालिकेचे मुख्यालयही धोकादायक इमारतींच्या यादीत आले आहे. त्यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेऊन महापालिकेने या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, पालिकेकडे तब्बल ९८ स्ट्रक्चरल आॅडिटर असताना पालिकेने पुन्हा आॅनलाइन निविदा मागविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
कृष्ण निवास इमारत धोकादायक यादीत नसतानाही पडल्याने आता शहरातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या इमारती खाली करण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आहे तसेच ३० वर्षे जुन्या असलेल्या इमारतींना स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या सूचनाही पालिकेने दिल्या आहेत.
कृष्ण निवास इमारत कोसळून १२ जणांचा बळी गेल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यानुसार, आतापर्यंत शहरातील अतिधोकादायक इमारती खाली करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे आता रस्त्यावर आली आहेत. तसेच पालिकेने ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या सूचना दिल्या असून येत्या सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असेही स्पष्ट केले आहे.
आता ठाणे महापालिकेने ही कारवाई सुरू केली असताना त्यांचेच मुख्यालय धोकादायक यादीत आल्याने या इमारतीचे पालिका काय करणार, असा सवाल ठाणेकरांकडून केला जाऊ लागला आहे. (प्रतिनिधी)