शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्ली... स्थानक आणि परिसर ‘मेकओव्हर’च्या वाटेवर

By admin | Updated: January 23, 2017 05:34 IST

सन १८५३ मध्ये तत्कालीन बोरीबंदर ते ठाणे रेल्वे दरम्यान रेल्वे सुरू झाली. नंतर ही रेल्वे ठाण्यापलिकडे कल्याण, कर्जत, कसारामार्गे

सन १८५३ मध्ये तत्कालीन बोरीबंदर ते ठाणे रेल्वे दरम्यान रेल्वे सुरू झाली. नंतर ही रेल्वे ठाण्यापलिकडे कल्याण, कर्जत, कसारामार्गे दक्षिण-उत्तर भारतात धावू लागली. १९२५ मध्ये विजेवर चालणारी इंजिने आली. त्यावेळी टाटांकडून वीज घेतली जात होती. मात्र, विजेबाबतीत स्वावलंबी असावे, यासाठी ब्रिटिशांच्या जीयआयपी रेल्वे या कंपनीने १९२९ मध्ये भारतातील पहिले वीज निर्मिती केंद्र ठाकुर्ली येथे सुरू केले. हे केंद्र ‘चोळा पॉवर हाऊस’ किंवा ‘कल्याण बिजली घर’ म्हणून ओळखले जात होते. त्यासाठी ठाकुर्ली खाडीनजीक १९१६ पासून १०० एकर जागा संपादित केली गेली. १९२९ ते १९८७ अशी ५८ वर्षे या पॉवर हाउसमध्ये टप्प्याटप्प्याने १३६ मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी दररोज ३० वॅगन दगडी कोळसा लागायचा. तो मध्य प्रदेश, झारखंड, बिहारहून येई. ठाकुर्ली खाडीच्या गोड्या पाण्याची बॉयरलरमध्ये वाफ केली जात असे. त्यासाठी कोळसा वापरला जात होता. ही वाफ वीज जनित्रांना पुरवली जायची आणि वीज निर्मिती होत असत. या पावर हाऊसमधील वीज मुंबई, लोणावळा आणि इगतपुरीदरम्यान वापरली जात होती. या पॉवर हाऊसमध्ये इंग्लंड, जर्मनी, जपानमधून आयात केलेली टर्बाइन आणण्यात आली होती. डिसेंबर १९८७ मध्ये या पॉवर हाऊसमध्ये बॉयलरचा मोठा स्फोट झाला. त्यात ४०० डिग्री से. इतक्या तापमानाच्या वाफेने आठ कर्मचारी भाजून मृत्युमुखी पडले. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांनी वीजनिर्मिती हे रेल्वेचे काम नसल्याचे जाहीर केल्याने डिसेंबर १९८७ पासून हे पॉवर हाउस बंद पडले. भविष्यात याच पॉवर हाऊसमध्ये देशातील पहिले एलिव्हेटेड (उड्डाण) टर्मिनस उभे राहणार आहे. १९२९ ला पॉवर हाऊसच्या निर्मितीमुळे ठाकुर्ली स्थानक अस्तित्वात आले. डोंबिवली पश्चिमेला असलेल्या मोठागाव ठाकुर्ली या गावाच्या नावावरून स्थानकाला ते नाव पडले. सुरुवातीला येथे फलाटही नव्हते. शिड्यांच्या आधारे प्रवासी गाडीत चढ-उतार करत असत. पुढे फलाटाची निर्मिती झाली. ब्रिटिश काळापासून रेल्वेच्या दृष्टीने ठाकुर्ली रेल्वे स्थानक महत्त्वाचे होते. पूर्वेला असलेल्या १२ बंगला परिसरात ब्रिटीश अधिकारी, तर पश्चिमेला ५२ बंगल्यात कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था होती. आता पूर्वेला बंगला परिसराचा ताबा आरपीएफकडे आहे. तेथे त्यांचे प्रशिक्षण स्थळ आणि निवास व्यवस्था आहे. ठाकुर्ली पूर्व-पश्चिमेला मिळून जवळपास २०० एकरांपेक्षा जास्त जागा रेल्वेच्या मालकीची आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील काही स्थानके ही कायमच उपेक्षित मानली गेली. त्यात ठाकुर्ली हे स्थानक होते. ठाकुर्ली ते कल्याण हा समांतर रस्ता तयार झाला. त्यामुळे याठिकाणच्या जागेला प्रचंड भाव आला. कांचनगाव, खंबाळपाडा, ठाकुर्ली स्टेशन विभागात १२ मजली व त्याहून अधिक उंचीचे टॉवर उभारले जात आहेत. लोकवस्ती वाढल्याने ठाकुर्ली स्थानकाचा वापरही वाढला. प्रवासी संख्या वाढत असली, तरी सोयी सुविधांची वानवा असल्याने रेल्वेकडे १९९८ पासून तत्कालीन स्थानिक भाजपा नगरसेवक श्रीकर चौधरी हे स्थानक विकासाच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला २०१६ मध्ये यश आले आहे.रेल्वेने कल्याण दिशेला पादचारी पूल आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यासाठी ३० कोटी रुपये मंजूर केले. त्यापैकी १७ कोटी रुपये खर्चून ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा विस्ताराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या पश्चिमेला होम प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. त्यात सध्या पादचारी पुलावर असलेली तिकीट खिडकी आता होम फ्लॅटफॉर्म खाली येणार आहे. पादचारी पूलावर चढून तिकीट काढण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागणार नाही. पूर्वेलाही तिकीट खिडकी असावी, अशी चौधरी यांची मागणी आहे.