शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दस्ताऐवजाद्वारे पासपोर्ट बनवून परदेशात प्रवास करणारा ठकसेन जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 00:18 IST

खोटया नावाने बनावट दस्ताऐवज तयार करुन पासपोर्ट बनवून परदेशात प्रवास करणारा कुख्यात गुन्हेगार सय्यद तुबलानी (रा. दहिसर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली.

ठळक मुद्देठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईआंध्रप्रदेशातून केली अंमली पदार्थाची तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: खोटया नावाने बनावट दस्ताऐवज तयार करुन पासपोर्ट बनवून परदेशात प्रवास करणारा कुख्यात गुन्हेगार सय्यद तुबलानी (रा. दहिसर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. त्याला १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्याच्या दहिसर भागातील रहिवाशी असलेला सय्यद अब्बास तुबलानी याने जसीम रेधाल तुबलानी हे नाव धारण करुन त्या नावाची बनावट कागदपत्रे तयार केली. त्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून परदेशात जाऊन आल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक पोपट नाळे, जगदीश मुलगीर, जमादार संजय भिवणकर, सत्यवान सोनवणे, सुरेश मोरे, अंकुश भोसले, हवालदार मोहन चौधरी आणि कल्याण ढोकणे आदींच्या पथकाने गोपनीय चौकशी केली. यात सय्यद अब्बास तुबलानी यास पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट मंजूर झाल्याची माहिती समोर आली. हा पासपोर्ट बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविला असल्याचेही उघड झाल्याने मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथे पत्रव्यवहार करुन जसीम रेधाल तुबलानी या बनावट नावाने त्याने मुंबईतून परदेशात प्रवास केल्याचीही बाब समोर आली. त्यानुसार १३ जुलै २०२१ रोजी सय्यद अब्बास रेधाल तुबलानी उर्फ जसीम रेधाल तुबलानी हा ठाकूरपाडा, दहिसर, ठाणे येथे येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याच आधारे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक लोखंडी सुरा, बनावट पॅनकार्ड, चालक परवाना मिळाला. त्याच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात फसवणूकीसह पासपोर्ट अ‍ॅक्ट १२ (ंअ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.* आंध्रप्रदेशातही गुन्हा दाखल-जसीम तुबलानी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईतील जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा तसेच आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथील चंद्रायानगुट्टा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थाच्या तस्करीचा गुन्हा नोंद असून मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यातही अन्य एक गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक