शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वाहतूककोंडीने जुने ठाणे पुरते गुदमरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:19 IST

काही वर्षांपूर्वी ठाणे म्हणजे नौपाडा अशीच काहीशी ओळख होती. तेव्हाचे ठाणे आतासारखे पसरलेले नव्हते. वाड्यांमुळे या भागाला वेगळी अशी शोभा होती.

अजित मांडके, ठाणेकाही वर्षांपूर्वी ठाणे म्हणजे नौपाडा अशीच काहीशी ओळख होती. तेव्हाचे ठाणे आतासारखे पसरलेले नव्हते. वाड्यांमुळे या भागाला वेगळी अशी शोभा होती. छानसा टूमदार असा परिसर होता. पण, आज इमारती आणि समस्यांच्या चक्रव्यूहात हा परिसर अडकल्याने यातून बाहेर कसे येणार किंवा कसे बाहेर काढणार, हा खरा प्रश्न आहे.एकेकाळी वाड्यांची संस्कृती, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जुन्या ठाण्याची ओळख आता केवळ वाहतूककोंडी म्हणूनच होऊ लागली असल्याचे चित्र मागील काही वर्षांत उभे राहिले आहे. धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न, रेल्वेस्थानक परिसरात वाढणारी वाहतूककोंडी, त्यात पार्किंगचा उडालेला बोजवारा आणि रस्त्यांच्या रुंदीकरणानंतरही फेरीवाल्यांनी मिळवलेला कब्जा, शेअर रिक्षाचालकांचा असह्य होणारा त्रास, यामुळे रेल्वेस्थानक परिसरातून आजूबाजूला किंबहुना अगदी हाकेच्या अंतरावर शहराची चौपाटी म्हणून ओळख असलेल्या मासुंदा तलावाकडे जायचे जरी झाले, तरी वाहतूककोंडीमुळे अनेक जण या ठिकाणी जाण्यासाठी काचकूच करताना दिसतात. त्यामुळे जुने ठाणे आता कोंडीचे ठाणे होते की काय, अशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.नौपाड्याला तसा फार पूर्वीचा इतिहास आहे. या ठिकाणी भास्कर कॉलनीत एकेकाळी वाड्यांची संस्कृती होती. आता त्याठिकाणी कालांतराने इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे आता या भागात हाताच्या बोटांवर मोजता येतील, एवढेच म्हणजे दोन ते तीन वाडे शिल्लक राहिले आहेत. त्यातही या ठिकाणी अरुंद असलेले रस्ते यामुळे येथील विकासही खुंटला आहे. रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेला परिसर म्हणूनही या भागाकडे पाहिले जात असले, तरी आजघडीला हा परिसरच असंख्य समस्यांनी ग्रासलेला आहे. नौपाड्यात बी केबिन परिसर, चेंदणी कोळीवाडा, शिवाजी पथ, गोखले रोड, राममारुती रोड, एलबीएस मार्ग, महात्मा गांधी रोड, स्टेशन परिसर, मासुंदा तलाव, संपूर्ण चरई आदी हा भाग समाविष्ट होतो. या भागाची लोकसंख्या सुमारे दीड लाखाच्या आसपास आहे. असे असले तरी आज या भागातून येणाऱ्याजाणाºयांची संख्या मात्र अधिक आहे. याच भागात रेल्वेस्थानक, एसटी, टीएमटी आगार, रिक्षा आणि टॅक्सीतळ असल्याने येथून रोज सुमारे साडेसहा लाख प्रवासी येजा करत असतात. या भागात आता वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. आजही या परिसरात फिरायचा विचार जरी झाला, तरी दोन मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्ध्या तासाच्यावर कालावधी लागतो, हे ‘रिपोर्टर आॅन दी स्पॉट’च्या माध्यमातून प्रकर्षाने जाणवले. रेल्वेस्थानक परिसरातूनच प्रवाशांना चालणे कठीण झाले आहे. याठिकाणी रिक्षातळ असताना आणि रिक्षाचालकांना शिस्त लागावी म्हणून पालिकेने येथे एक प्रयोगही केला. परंतु, हा प्रयोगदेखील सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. लेनच्या बाहेर जाऊन रिक्षा लावणे, वाहतुकीला आणि पादचाºयांना अडथळे निर्माण करणे, सर्रास प्रवाशांबरोबर हुज्जत घालणे, असे प्रकार या शेअर रिक्षाचालकांकडून नेहमीच सुरू असतात. स्टेशन परिसराच्या थोडे बाहेर आल्यानंतरदेखील अलोक हॉटेल, नौपाड्याकडे जाणारा रस्तादेखील या बेशिस्त रिक्षाचालकांनी जसा काही आपल्या नावावर केल्याचे दिसते. या रिक्षाचालकांना शिस्त लावण्याऐवजी वाहतूक पोलीसही त्यांच्यात सहभागी झालेले दिसतात. त्यामुळे या भागातून सकाळ, संध्याकाळ चालणे दुरापास्त होऊन जाते. मासुंदा तलाव परिसरदेखील सकाळी आणि सायंकाळी खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी आणि घोडागाड्यांमुळे वेढलेला दिसतो. रोज संध्याकाळी या भागात या दोघांमुळे चक्काजामची परिस्थिती निर्माण झालेली असते. त्यामुळे या भागात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांचीदेखील घोर निराशा होताना दिसते. गडकरी रंगायतन, ओपन हाउस, गोखले रोड, मल्हार सिनेमा रोड, एलबीएस मार्ग आदी मार्गदेखील सायंकाळी वाहनांच्या गर्दीने व्यापलेले दिसतात.