मीरा भाईंदर मध्ये ठाकरेसेना व भाजपा माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश

By धीरज परब | Updated: May 29, 2025 22:52 IST2025-05-29T22:51:56+5:302025-05-29T22:52:18+5:30

मीरा भाईंदर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तर भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता असे दोन सत्तेतील प्रमुख नेते शहरात आहेत.

Thackeray Sena and BJP former corporators join Shinde Sena in Mira Bhayandar | मीरा भाईंदर मध्ये ठाकरेसेना व भाजपा माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश

मीरा भाईंदर मध्ये ठाकरेसेना व भाजपा माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश

मीरारोड - महापालिका निवडणुकीच्या संकेता नंतर मीरा भाईंदर मध्ये राजकीय पक्षांतरांना सुरवात झाली असून शिवसेना शिंदेगट व भाजपात राजकीय भरती वरून चढाओढ लागली आहे. बुधवारी रात्री भाजपाचे माजी नगरसेवक संजय पांगे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दिनेश नलावडे यांनी शिवसेना शिंदे गटात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश 

मीरा भाईंदर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तर भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता असे दोन सत्तेतील प्रमुख नेते शहरात आहेत. महापालिका निवडणुकीचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्या नंतर राजकीय हालचालींना सुरु झाल्या आहेत.  ह्या आधी मीरारोड येथील भाजपाचे माजी नगरसेवक अश्विन कासोदरिया यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना मीरा भाईंदर गुजराती सेनेचे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी कोंग्रेस अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी सभापती मोहन पाटील, भाजपाचे माजी स्वीकृत सदस्य असलेले सजी आयपी, माजी भाजपा मंडळ अध्यक्ष राजेंद्र मोरे तसेच माधुरी राय, मंजू कनोजिया, मोहनीश सुम्बड आदी अनेकांनी मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.  आ. मेहतांच्या विविध प्रकरणां विरुद्ध तक्रारी करणारे राजू गोयल यांनी देखील शिंदे सेनेत प्रवेश केल्याने चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी हरियाणा व उत्तरप्रदेश संपर्क प्रमुख विक्रम प्रताप सिंह, जिल्हाप्रमुख राजू भोईर, महिला संघटक निशा नार्वेकर, पूजा आमगावकर, रिया म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

तर आ. नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेच्या कल्पना पारंगे यांनी तर उद्धवसेनेचे विभागप्रमुख संतोष डेरे सह समर्थकांनी भाजपात प्रवेश केला होता. जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, डॉ. सुरेश येवले, महेश म्हात्रे, रथिन दत्ता, मंडळ अध्यक्ष दीपक सावंत आदी उपस्थित होते. 

Web Title: Thackeray Sena and BJP former corporators join Shinde Sena in Mira Bhayandar