व्यापाऱ्यावर ठाण्यात खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:27 IST2018-08-11T02:27:17+5:302018-08-11T02:27:20+5:30

माजिवडा भागातील एका व्यापा-याच्या भावावर खुनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी करणा-या लुटारूंच्या अटकेसाठी कापूरबावडी पोलिसांनी पाच जणांच्या पथकाची निर्मिती केली आहे.

Thackeray killer on businessman | व्यापाऱ्यावर ठाण्यात खुनी हल्ला

व्यापाऱ्यावर ठाण्यात खुनी हल्ला

ठाणे : माजिवडा भागातील एका व्यापा-याच्या भावावर खुनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी करणा-या लुटारूंच्या अटकेसाठी कापूरबावडी पोलिसांनी पाच जणांच्या पथकाची निर्मिती केली आहे. या पथकाने वर्तकनगर भागात दुसºया दिवशीही शोध घेतला. परंतु, ते मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बाळकुम भागातील हॉटेल व्यावसायिक हे ८ आॅगस्टला मध्यरात्री बाळकुमनाका थांब्याजवळून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांना मुकेश शेट्टी, सागर गायकवाड आणि संदीप या तिघांनी अडवून त्यांच्याकडून मोबाइल आणि सोनसाखळी घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, या टोळक्याने त्यांच्या भावाच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर कोयत्याने वार केले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यापैकी मुकेशला अटक केली. तर, त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या शोधासाठी एक उपनिरीक्षक आणि चार कर्मचाºयांचे एक पथक तयार केले आहे.

Web Title: Thackeray killer on businessman