ठाकरे सरकार पळपुटे : भाजपचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST2021-09-21T04:45:43+5:302021-09-21T04:45:43+5:30
ठाणे : किरीट सोमैया यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल, या भीतीपोटी सोमैया यांनाच चार भिंतीआड दडवून ...

ठाकरे सरकार पळपुटे : भाजपचा आरोप
ठाणे : किरीट सोमैया यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल, या भीतीपोटी सोमैया यांनाच चार भिंतीआड दडवून संकटापासून वाचवण्याची ठाकरे सरकारची युक्ती म्हणजे पळपुटेपणाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचाच प्रकार आहे. अशा भ्याडपणामुळे राज्यातील भ्रष्टाचारास पाठबळ मिळत आहे, असा आरोप भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सोमवारी केला.
धोरण आणि निर्णयाची कोणतीही क्षमता नसल्यामुळेच कोणत्याही प्रश्नावर भूमिका न घेता, प्रश्नच दडपण्याच्या धोरणामुळे ठाकरे सरकारने जनतेस असुरक्षिततेच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले असून गुन्हेगारांना मात्र मोकाट सोडले आहे. देशाच्या सुरक्षिततेला आव्हान असलेल्या अतिरेकी कारवायांचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होत असताना पोलीस दल मात्र सोमैय्या यांच्यावरील अनैतिक कारवाईसाठी बळ वाया घालवत आहे, याबद्द्ल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
........