शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयाचा दशकपूर्ती सोहळा, स्थानिक कलाकारांचा स्वर साधना कार्यक्रम संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 4:30 PM

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयाचा दशकपूर्ती सोहळा संपन्न झाला. यावेळी स्थानिक कलाकारांनी मराठी - हिंदी गाणी सादर केली. 

ठळक मुद्देब्रह्मांड कट्टयाचा दशकपूर्ती सोहळा मराठी - हिंदी गाणी सादर जुन्या गाण्यांना उजाळा देऊन रसिकांच्या जुन्या स्मृती जागृत

ठाणे : ब्रह्मांड कट्टयाच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या वातावरण निर्मितीसाठी रविवारी कशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथील मुख्य नाट्यगृहमध्ये  स्थानिक कलाकारांचा स्वर साधना मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमामध्ये सहभागी कलाकार स्थनिक असून कलाकारांनी एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर केली. सध्याच्या बॉलीवूड युगामध्ये सुद्धा जुन्या गाण्यांना उजाळा देऊन रसिकांच्या जुन्या स्मृती जागृत केल्या. 

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतांनी सर्व गायक कलाकारांनी केली.  शिव जयंतीचे औचित्य साधून शाहीर साबळे यांचे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत जगदीश कानडे यांनी सादर करुन शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. यानंतर एका पाठोपाठ एक अशी गाण्याची गुंफन सुरु झाली यामध्ये दो सितारोंका जमीन पर है मिलन आज की रात,  दिल बेकरार सा है,  चेहरे से जरा ऑचल , आरे यार मेरी तुम भी हो गजब,  हम तुम्ह युग युग से ये गीत मिलन के गाते रहेगे,  डम डम डिगा डिगा अशी रफी, मुकेश, किशोर,  लता, आशा यांची गीते सादर केली तर कजरा मोहब्बात ,तुम जो मिल गये सारख्या गाण्यांमा प्रेक्षकांची वन्समोरची दाद मिळाली.  मध्यांतर नंतर मोरनी बागा मा बोले आधी रात में या गाण्यावर सानिका गोडे हीने डान्स करुन श्रीदेवीला श्रध्दांजली अर्पण केली.  आजीब दास्तान है,  एक प्यार का नगमा है,  खुब सुरत हसीना,  चुप गये सारे नजारे,  जाने कहॉ गये ओ दिन, मेरे मितवा मेरे मित्र रे,  परदेसीया ऐ सच है प्रिया,  तर मराठीत रेश्माच्या रेघांनी व मी डोलकर डोलकर दर्याचा राजा अशी एका पेक्षा एक गीते सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.  गायक कलाकारांच्या पहिल्याच कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांची उत्तम साथ लाभली. कार्यक्रमाचा शेवट हम किसी से कम नही सिनेमातील मेडलीने करण्यात आला.  कार्यक्रमाचे सर्वेसर्वा श्री कानडे यांनी मुकेश,रफी ,किशोर , पंचम ,शाहीर साबळे यांच्या सर्वांच्या आवाजात गाणी गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून ठेवले तर श्री मिलिंद पाताडे , नीलम भोगटे , अनिता शरण , स्वाती देशमुख , ज्योती धीवर हेमंत वायाळ,  यांची ही गाणी हिट झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा पेडणेकर यांनी माहीतीपूर्वक केले तर कार्यक्रमाला मनोज पवार व मंगेश मोरे यांचे संगीत दिग्दर्शन लाभले.  स्वर साधना कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव यांनी मानले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई