ठाण्यात बनावट विदेशी मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:50 AM2019-03-08T00:50:49+5:302019-03-08T00:50:52+5:30

मुंबई-नाशिक महामार्गावरून ट्रकमधून छुप्या पद्धतीने होणारी बनावट विदेशी मद्याची तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी शहापूर तालुक्यातील खर्डी येथे पकडली.

Textured foreign liquor seized in Thane | ठाण्यात बनावट विदेशी मद्य जप्त

ठाण्यात बनावट विदेशी मद्य जप्त

Next

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरून ट्रकमधून छुप्या पद्धतीने होणारी बनावट विदेशी मद्याची तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी शहापूर तालुक्यातील खर्डी येथे पकडली. याप्रकरणी ट्रकचालक संतोष सिंग, नामदेव खैरे आणि सुविनय काळे ऊ र्फ अमोल यांना अटक करण्यात आली आहे. दारूबंदी कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये विक्रीसाठी आणलेल्या ४०० मद्याच्या बॉक्ससह कार आणि ट्रक असा ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने बेकायदा दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाची करडी नजर असल्याचे निरीक्षक सुधीर पोकळे यांनी सांगितले.
मध्य प्रदेशातून मुंबईकडे ट्रकमधून बेकायदा दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार, राज्य उत्पादन शुल्क मुंबई आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, कोकण विभागाचे विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे (मुंबई) संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे भरारी पथकाचे निरीक्षक सुधीर पोकळे, निरीक्षक अनिल राठोड, जवान दीपक दळवी, जगन्नाथ आजगावकर यांच्या पथकाने खर्डी येथे संशयित ट्रक तपासणीसाठी थांबवला. ट्रकचालकाकडे हा ट्रकरिकामा असल्याचे सांगितले; मात्र ट्रकची तपासणी केली असता मद्याचे बॉक्स लपवल्याचे उघड झाले. ट्रकचालक संतोष याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने हे मद्य नामदेव खैरे यांचे असून ते कारमधून येत असल्याचे सांगितले. खैरे येत असलेली कार थांबवून तपासणी केली असता, मद्यसाठा आढळला. त्यांच्यासोबत काळे हाही होता. या तिघांना अटक केली.
>अशी पकडली तस्करी : ट्रकमध्ये चालकाची केबिन आणि ट्रकच्या मागील बाजूस लोखंडी पट्टी नटबोल्टने फिट करून पाच फुटांचा बॉक्स करून त्यामध्ये मद्यसाठा लपवण्यात आल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले. वरकरणी रिकामा वाटणाऱ्या या ट्रकमधील ही पट्टी काढल्यानंतर त्यामध्ये मद्याचे बॉक्स सापडले. हे मद्य मध्य प्रदेशात बनवल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Textured foreign liquor seized in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.