शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

नाहक फिरणाऱ्यांची चाचणी; मार्केटमधील गर्दी ओसरली, आयकार्ड बघूनच रेल्वेचे तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 00:07 IST

काेरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील पातलीपाडा, वाघबीळनाका, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी, नितिन कंपनी, तिनहातनाका, जांभळीनाका, कोर्टनाका आदींसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क  ठाणे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याची मुभा असून दुकानांच्या वेळाही बदलल्या आहेत. त्यानुसार ठाण्यात कडक अंमलबजावणी केली जात असली तरी ठाणे परिवहनच्या बसमधून सर्वांनाच प्रवासाची मुभा दिल्याचे चित्र दिसत होते. ठाण्यातील मुख्य मार्केटमध्ये रोजच्या सारखी गर्दी नसली तरी नागरिक थोड्या बहुत प्रमाणात खरेदीसाठी दिसत होते. पोलीस ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून तपासणी करीत होते. विशेष म्हणजे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची ॲंटीजेन चाचणी जांभळी नाक्यावरील मार्केटमध्ये केली जात होती. काेरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील पातलीपाडा, वाघबीळनाका, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी, नितिन कंपनी, तिनहातनाका, जांभळीनाका, कोर्टनाका आदींसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात होती. फक्त अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडणाऱ्या गाड्यांना परवानगी दिली जात होती. मात्र, ठाणे परिवहनच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांचे आयकार्ड तपासले जात नव्हते. उलट आम्हाला पालिका प्रशासनाकडून कोणतेच निर्देश नसल्याचे परिवहनचे कर्मचारी सांगत होते. त्यामुळे आम्ही बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थांबवत नसल्याची माहिती त्यांनी दिली. ठाण्यात रुग्णांसाठी हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन आणि अत्यावश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा भासत असून दररोज अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शहरात एवढी विदारक स्थिती असताना देखील नागरिक आणि प्रशासन मात्र बेफिकीरपणे वागत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. सामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन, मेट्रोचा प्रवास प्रतिबंधित केल्याने चाकरमानी बससेवेकडे वळले खरे. परंतु. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाल्याचे चित्र शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटिस येथे दिसले. 

सूचना देण्यासाठी भाेंग्याचा वापरठाण्यातील जांभळीनाका भाजी मार्केटमध्ये शुक्रवारी गर्दी होती. परंतु, प्रमाण मात्र थोडे कमी होते. सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी असल्याने नागरिक त्याठिकाणी खरेदीसाठी जात होते. गुरुवारपासून लॉकडाऊन सुरू  झाले आहे. या लॉकडाऊनमध्ये लोकांनी कोरोनाचे नियम पाळावे यासाठी पोलिसांनी भोंग्यावर लोकांना सूचना देण्याची सुरुवात केली आहे. तर विनाकरण जे फिरतात त्यांच्यावर कारवाई तर पोलीस करतच आहेत, परंतु आता अशा  लोकांची ॲंटीजेन टेस्ट पोलिसांनी सुरु केली आहे. जे विनाकारण फिरताना दिसत होते, त्यांना थेट ॲंटीजेन टेस्टच्या रांगेत उभे करुन त्यांची चाचणी केली जात होती. 

स्थानकात प्रवाशांसाठी वेगळी मार्गिकाशुक्रवारी सकाळी ठाणे रेल्वेस्थानकात लॉकडाऊनचे परिणाम दिसून आले. रेल्वे पोलीस भोंग्यावर प्रवाशी वर्गाला सूचना देत होते. विनाकारण प्रवास करू नका नाहीतर कारवाई होईल, असे आवाहनदेखील पोलीस यावेळी करत होते. स्थानकात प्रवाशांसाठी वेगळी मार्गिका तयार केली आहे. तिकीट खिडकीवर प्रवाशांचे आयकार्ड चेक करून मगच त्यांना तिकीट दिले जात होते. 

वर्दळ झाली कमीशुक्रवारी रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचे दिसत होते. केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच मुभा दिली जात होती. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुलुंड टोलनाका याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती. तसेच विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई देखील केली जात होती. 

बेजबाबदार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणमीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची पोलीस व पालिकेने आता नाक्यानाक्यावर चाचणी सुरू केली आहे. शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असताना दुसरीकडे बेजबाबदार नागरिक, व्यावसायिक मोकाट फिरत आहेत. त्यातच अनेक नागरिक, फेरीवाले व व्यावसायिक मास्क घालत नाहीत किंवा मास्क अर्धवट घालतात. पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. त्यातच या नागरिकांना पोलीस नाक्यांवर सुरू केलेल्या पालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रात नेऊन त्यांची कोरोना चाचणी करायला लावत आहेत. अहवाल पॉझिटिव्ह येताच त्या व्यक्तीला थेट अलगीकरण किंवा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे. त्यामुळे बेशिस्त व बेजबाबदार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या