शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

वाशिंदजवळ भीषण अपघात, एकाच दुचाकीवरून ४ जणांचा जीवघेणा प्रवास; तिघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 22:53 IST

या भीषण अपघातात विरुद्ध दिशेने येऊन धडकणाऱ्या दुचाकी वरील 3 जण जागीच मयत झालें तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली.

शाम धुमाळ

कसारा - मुंबई नाशिक महामार्गावरील वाशिंद खातीवली जवळ भीषण आपघात होऊन 3 जण जागीच ठार झालें तर एक 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली.आज संध्याकाळी 4 च्या सुमारास खातीवली वासिंद हायवे वरील हॉटेल धिंग्राच्या पुढे नाशिकहून मुबंईकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकल्याने हा भीषण अपघात  झाला. 

ललन राय हा ट्रॅक्टर चालक मुंबईहून वासिंद गावाकडे जात असताना अचानक पणे समोरून चुकीच्या दिशेने भरधाव वेगात येणारी दुचाकी क्रमांक MH 04 SC 490 चा चालक थेट ट्रॅक्टर वर येऊन धडकला. या भीषण अपघातात विरुद्ध दिशेने येऊन धडकणाऱ्या दुचाकी वरील 3 जण जागीच मयत झालें तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली. मंजुळा सखाराम मुकणे, अजनूप, शिरोळ, गणपत दगडू वाघे. परदेश वाडी इगतपुरी, बाबू मधू फसाळे, दहिवली मुरबाड अशी मयत झालेल्यांची नावे असून मयतांचे मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवव्हिच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

या अपघातात एक नऊ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला सायन हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या भीषण अपघाताची माहिती मिळताच, वासिंद पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी, महामार्ग पोलीस शहापूर टॅपचे अधिकारी कर्मचारी, दाखल झाले या दरम्यान आपत्ती टीम सदस्य निलेश शेलार, निलेश काठोळे ,व  स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना रिक्षामध्ये रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान या प्रकरणी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वासिंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव पुढील तपास करीत असून ट्रॅक्टर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दुर्घटनास्थळाजवळी स्पीड ब्रेकर काढल्याने अपघातात वाढदरम्यान ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे स्पीड ब्रेकर होते ते हायवेच्या ठेकेदार कंपनीने काढल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी व येणारी वाहने सुसाट असतात. परिणामी पेट्रोल पंपावरून येणारी वाहने असोत अथवा सर्व्हिस रोडवरून येणारी वाहने असोत ती मुख्य रस्त्यावर स्पीडने येत असतात परिणामी मागून येणाऱ्या वाहनांची काही कल्पना नसल्याने अपघात होतात. या ठिकाणी रबरिंग स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे अशी मागणी आता वासिंद व खातीवलीकर करीत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात