शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

बालकांच्या २५ टक्के आरक्षणातील प्रवेशाच्या ठाणे जिल्ह्यात दहा हजार जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 17:55 IST

दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये देखील आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलां - मुलींसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवून मोफत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा राखिव आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे सहा हजार २९१ जागांवर प्रवेश निश्चित केले

ठळक मुद्दे शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणा-या ६४० शाळांमध्ये या १६ हजार ५४६ जागा आरक्षित जागा रिक्त असूनही विद्यार्थ्यास दूरवरून यावे लागण्याच्या कारणाखाली काही शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारात आहेत.पालकांना चांगले वागणून न देता अपमानीत करण्याचा देखील प्रयत्न

ठाणे : मोठमोठ्या रकमेच्या देणग्या देऊन बालकांचे प्रवेश श्रीमंत पालकांकडून घेतले जातात. या महागड्या पण दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये देखील आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलां - मुलींसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवून मोफत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा राखिव आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे सहा हजार २९१ जागांवर प्रवेश निश्चित केले. तिस-या फेरी अखेरच्या या प्रवेशानंतर देखील जिल्ह्याभरात अजून दहा हजार २५५ जागा रिक्त आहेत. त्यासाठी दोन दिवसात चौथ्या फेरीव्दारे प्रवेश देण्याचे प्रयत्न आहेत.           प्लेगृप, फ्रीकेजी, ज्युनिअर केजी, सिनिअर केली आणि फर्स्ट म्हणजे पहिलीच्या वर्गात या २५ टक्के आरक्षणातून बालकांना मोफत प्रवेश मिळत आहे. शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणा-या ६४० शाळांमध्ये या १६ हजार ५४६ जागा आरक्षित आहेत. त्यापैकी दोन फे-यांव्दारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. तिस-या फेरीव्दारे निवड केलेल्या ९३९ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ १५० विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी आहेत. संबंधीत शाळांमध्ये हे प्रवेश झाले आहेत. मात्र त्यांनी आॅनलाईन अपडेट अजून केले नाहीत. पण आगामी दोन दिवसात या प्रवेशांचे अपडेट व पुन्हा चौथ्या फेरीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड होईल, असा दावा शिक्षण विभागाव्दारे करण्यात आला.              आधीच्या दोन फे-यांव्दारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. आता तिस-या फेरी अखेर ९३९ निवड केलेल्यापैकी प्लेगृपसाठी दहा विद्यार्थ्यांचे प्रवेश आहेत. तर प्रीकेजीच्या वर्गासाठी २२६ विद्यार्थी, ज्यु.के.जी.साठी ३१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. याप्रमाणेच सीकेजीच्या वर्गासाठी चार विद्यार्थी आणि पहिलीच्या वर्गा करीता ३८३ विद्यार्थ्यांना या तिस-या फेरीव्दारे दिल्याचे नियोजन आहेत. पाल्याचे प्रवेश वेळेत घेण्यासाठी पालकांना सतत सांगितले जात असल्याचे सांगितले जात आहेत. पण विविध कागदपत्रांसह अन्य तृटींच्या कारणाखाली संबंधीत बालकांच्या पाल्याना प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रवेश घेतलेल्या बालकांची संख्या कमी दिसून येत आहेत.** जागा रिक्त असूनही विद्यार्थ्यास दूरवरून यावे लागण्याच्या कारणाखाली काही शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारात आहेत. तर काही विविध कागदपत्रे, आधारकार्ड आदींच्या त्रृटी काढून प्रवेश नाकारले जात आहेत. पालकांना चांगले वागणून न देता अपमानीत करण्याचा देखील प्रयत्न काही शाळांमध्ये होत असल्याच्या तक्रारी पालकांच्या आहेत. शाळेतील साहित्य , गणवेश, स्कूल बस प्रवास आदीं शुल्कांबाबत देखील पालक व शाळांमध्ये शाब्दीक चकमकी होत असल्यामुळे प्रवेश रखडले जात आहेत. तर काहींकडे मोबाईल नसल्यामुळे निवड झाल्याचा निरोप वेळेत न मिळाल्याची समस्या देखील या आरटीई प्रवेशात ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा