ठाण्यात मंदिराची भिंत पडली
By अजित मांडके | Updated: July 31, 2023 16:08 IST2023-07-31T16:08:39+5:302023-07-31T16:08:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : वागळे इस्टेट,आय.टी.आय सर्कल, या ठिकाणी असलेल्या वरखंडे चाळीजवळील गणपती मंदिराची भिंत पडल्याची घटना सोमवारी ...

ठाण्यात मंदिराची भिंत पडली
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वागळे इस्टेट,आय.टी.आय सर्कल, या ठिकाणी असलेल्या वरखंडे चाळीजवळील गणपती मंदिराची भिंत पडल्याची घटना सोमवारी दुपारी एक ते सव्वा एक वाजण्याच्या सुमारास समोर आली.
साधारणपणे १० फूट लांब व १० फूट उंच भिंत पडली असून उर्वरित भिंत धोकादायक स्थितीत आहे. तर घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून धोकापट्टी बांधण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वागळे प्रभाग समितीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी ध्व घेतली होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.