शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

‘तेजस्विनी’ अद्याप पुरुषांच्याच हाती, ठामपा परिवहन समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 12:48 AM

टीएमटीच्या ताफ्यात एकूण ३५३ बस आहेत. त्यापैकी दररोज २८० बसगाड्या शहरातील विविध मार्गांवर धावतात.

ठाणे : महिलांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा, या उद्देशाने टीएमटीच्या ताफ्यात तेजस्विनी बस दाखल झाल्या. मात्र, प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे लेडिज स्पेशल तेजस्विनी बसचे स्टेअरिंग आणि तिकीटबॅग अद्यापही पुरु षांच्याच हातात आहे. महिलांच्या सोयीकरिता या तेजस्विनीचा कारभार ‘ती’च्या हाती देण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या जाचक अटी, बोटचेप्या नियमावलीमुळे या बसमधून प्रवास करणाऱ्या ‘ती’चा हिरमोड झाला आहे. हा सावळागोंधळ परिवहनच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी चव्हाट्यावर आणला असून, तेजस्विनी बसेसवर महिला चालक आणि वाहकांची नेमणूक करण्याचे आदेश परिवहन सभापतींनी दिले आहेत.टीएमटीच्या ताफ्यात एकूण ३५३ बस आहेत. त्यापैकी दररोज २८० बसगाड्या शहरातील विविध मार्गांवर धावतात. त्यामध्ये वातानुकूलित २३ बसचा समावेश आहे. ही सेवा अधिक सक्षम करण्यासाठी अवघ्या काही दिवसांपूर्वी १० तेजस्विनी बसगाड्या सेवेत दाखल झाल्या.गर्दीच्या वेळेत सकाळ व संध्याकाळ महिलांसाठी, तर दुपारच्या वेळेत सर्वांसाठी या बस चालवण्यात येतात. नियमानुसार तेजस्विनी बसवर महिला चालक व वाहक देणे बंधनकारक आहे. मात्र, परिवहन प्रशासनाने तेजस्विनीवर पुरु ष चालक व वाहक दिले आहेत. याप्रकरणी परिवहन सदस्य प्रकाश पायरे यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. अशा पद्धतीने तेजस्विनी बस चालवल्यास या योजनेचा मूळ हेतू सफल होत नसल्याचा मुद्दा पायरे यांनी मांडला.तब्बल २० तेजस्विनी बस आनंदनगर आगारात धूळखात पडल्या आहेत. या बस मार्गावर चालवाव्यात, हा मुद्दा सदस्य दशरथ यादव यांनी मांडला. ठाणे-बोरिवली मार्गावर धावणाºया टीएमटी बसच्या दुरवस्थेबाबत सदस्य राजेश मोरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले.शैक्षणिक अर्हतेमुळे महिला वाहकांच्या नियुक्तीला ब्रेकआरटीओकडून सातवी पास महिलांना बॅज देण्यात येतात. त्याआधारे त्यांची भरती करावी, असा मुद्दा प्रभारी परिवहन समिती सभापती राजेंद्र महाडिक यांनी मांडला.मात्र, या महिला किमान दहावी पास असाव्यात, हा मुद्दा प्रशासनाने उपस्थित करून नियुक्त्यांना ब्रेक लावल्याचे सर्वसाधारण सभेत समोर आले.त्यामुळे आता आरटीओच्या निकषांप्रमाणेच महिलांची भरती प्रक्रि या पूर्ण करावी. त्यांना नोकरीपासून वंचित ठेवू नका, असे परिवहनचे पदसिद्ध सदस्य, स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी अधिकाºयांना बजावले.

टॅग्स :thaneठाणे