शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अश्रू झाले अनावर, हुंदक्यांचा फुटला बांध; वेदांत रुग्णालय प्रशासनावर संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 23:30 IST

वेदांत रुग्णालय प्रशासनावर संताप : दोषींवर कारवाई करण्याची मृतांच्या नातलगांनी केली मागणी

ठाणे  : रात्रीपर्यंत वडील माझ्याशी बोलत होते, त्यांची ऑक्सिजन लेव्हल मागील तीन दिवसांपासून ९७ होती, माझ्या  नातेवाईकांची पाठ दुखत होती, ते व्हिडिओ कॉलवर रात्री आमच्या सर्वांशी चांगले बोलले.. आणि सकाळी रुग्णालयातून फोन आला की तुमचे वडील दगावले, तुमचे नातेवाईक गेले.. त्यामुळे सकाळपासूनच वर्तकनाक्यावरील वेदांत हॉस्पिटलबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले होते. कोणी रडत होते, कोणी मृतांच्या आठवणींनी हंबरडा फोडत होते, तर कुणी रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त करीत होते. 

वर्तकनगर नाक्यावर वेदांत रुग्णालय आहे. या ठिकाणी सकाळीच रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी झाली. त्यात सोशल मीडियावर ऑक्सिजनच्या अभावामुळे ६ जणांचा मृत्यू, असा मेसेज व्हायरल झाल्याने रुग्णालयाच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त होता. रुग्णालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. कोणी आपले वडील गेले, तर कोणी आपली आई गेली म्हणून जोरजोरात हंबरडा फोडत होते. 

रुग्णालयाच्या चुकीमुळेच माझा भाऊ गेला, त्याची काहीच चूक नव्हती. मुलुंडला आम्हाला बेड मिळाला नाही, म्हणून भावाला शनिवारी रात्री या रुग्णालयात ॲडमिट केले होते. रात्री त्याचे आमच्याशी बोलणे झाले होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हलदेखील उत्तम होती. परंतु, सकाळी फोन आला, तुमचा भाऊ गेला. पायाखालची वाळूच सरकली. त्यातही रुग्णाला ॲडमिट करताना आम्ही रीतसर आधीच त्यांच्या मागणीनुसार ५० हजार रुपये भरले होते. त्यानंतरही पैशांची मागणी सुरूच होती. अशातच रुग्णालयाकडून अशी माहिती आल्यानंतर आणखीनच शॉक बसल्याचे रुग्णाचे नातेवाईक सतीश पाटील हे सांगत होते. सतीश यांची पत्नी, मृत विजय पाटील यांची पत्नी आणि मुलगा हुंदके देऊन रडत होते. 

पोलिसांवर केली नातलगांनी आगपाखड वेदांत रुग्णालयाची बातमी सोशल मीडियावर पसरताच रुग्णांचे नातलग तिथे जमा झाले. यावेळी पोलीस गर्दी करू नका, म्हणून सर्वांची समजूत काढताना दिसत होते. परंतु, रुग्णांचे नातेवाईक आमच्या माणसाचा गेलेला जीव तुम्ही भरून देणार आहात का?, आमच्या नातेवाईकाच्या मृत्यूची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? असे सवाल करून पोलिसांवरदेखील आगपाखड करीत होते. त्यांना आवरताना पोलिसांची दमछाक झाली.

नेत्यांना घेराव घालून न्यायाची मागणीगृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांना रुग्णांच्या नातेवाईकांनी घेराव घालून आम्हाला न्याय द्या, आमच्या नातेवाईकांचा मृत्यू रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे, ऑक्सिजनअभावीच मृत्यू झाला आहे, त्यामुळे कारवाई करावी, अशी मागणी हुंदके देऊन करीत होते. या दुर्घटनेमुळे रुग्णांच्या नातलगांचे अश्रू अनावर झाले होते. 

रुग्णालयाचे वातावरण झाले शोकाकुलमाझे वडील चांगले होते, तीन दिवस त्यांची ऑक्सिजन लेव्हल ९७ होती. परंतु, अचानक डॉक्टरांनी सांगितले, तुमचे वडील गेले. या रुग्णाची मुलगी रुग्णालयाच्या खाली अक्षरश: हुंदके देत रडत होती. एकूणच रुग्णालयाचे वातावरण शोकाकुल झाले होते. कोणी रुग्णालयावर कारवाईची मागणी करीत होते, कोणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते. हे वेदांत नाही, वेदनादायी रुग्णालय असल्याचा आरोप यावेळी केला.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, भाजप आ. निरंजन डावखरेंसह  इतर नेत्यांची हजेरी

वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि बड्या राजकीय नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या तसेच आमदार निरंजन डावखरे  यांच्याबरोबरच मनसेच्या नेत्यांसह अनेक स्थानिक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी या नेत्यांनी केली.

भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रकरणावरून यंत्रणेवरच टीका करून ठाकरे सरकारवरच निशाणा साधला. तर या प्रकरणात दोषी असलेल्या रुग्णालयाच्या प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली. सरकारचे प्रतिनिधी म्हणून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संपूर्ण प्रकारची चौकशीचे आदेश देतानाच महापालिका प्रशासनाकडून प्रत्येक रुग्णालयांचा ऑक्सिजनबाबत आढावा घेतला जात असल्याचे सांगितले. 

दोन दिवसांत कारवाई करा ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, संबंधित हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरविण्याची जबाबदारी कोणाकडे होती? ऑक्सिजन साठा संपुष्टात येत असतानाही तातडीच्या उपाययोजना का केल्या नाहीत? पुरेसा साठा ठेवण्याची दक्षता का घेतली गेली नाही? या घटनेला  कोण जबाबदार आहे? या विविध मुद्द्यांबाबत सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून दोषींवर दोन दिवसांत कारवाई करावी.      - निरंजन डावखरे, आमदार भाजप 

ऑक्सिजन ही अत्यावश्यक बाब आहे, त्याचे नियोजन करणे गरजेचे होते. हॉस्पिटल प्रशासनाच्या चुकीमुळे चार जणांचे मृत्यू झालेले आहेत. एकीकडे ऑक्सिजन असल्याचे सांगितले जात आहे; परंतु तो पुरवठा होत आहे का? हे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी.- संदीप पांचगे, मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष, ठाणे

ही माणुसकीला काळिमी फासणारी  घटना आहे. वारंवार येथे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालय प्रशासनावर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.     - महेश कदम, मनसे नेते

टॅग्स :thaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारhospitalहॉस्पिटल